जाहिरात

हेमा मालिनींसाठी बूक केलं होतं 100 खोल्यांचं हॉस्पिटल; धर्मेंद्र यांचा तो किस्सा, VIDEO होतोय व्हायरल

दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या 'जीना इसी का नाम है' या चॅट शोमधील एक मजेदार किस्सा सध्या व्हायरल होत आहे. जो धर्मेंद्र यांच्या प्रेमाची आणि खासगी आयुष्याला महत्त्व देण्याच्या वृत्तीची जाणीव करून देतो.

हेमा मालिनींसाठी बूक केलं होतं 100 खोल्यांचं हॉस्पिटल; धर्मेंद्र यांचा तो किस्सा, VIDEO होतोय व्हायरल
Dharmendra booked 100-room hospital for Hema Malini

भारतीय चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी 89 व्या वर्षी निधन झाले. 12 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीतील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून, चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे.

धर्मेंद्र यांनी 'दिल भी तेरा हम भी तेरे'या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'शोले', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'अनुपमा', 'सीता और गीता' अशा 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.

पाहा VIDEO

Dharam booked an entire 100 rooms hospital for Hema when she had to deliver Esha... sounds disgusting
byu/HardTune272 inBollyBlindsNGossip

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

हेमा मालिनींसाठी 100 खोल्यांचं हॉस्पिटल केलं होतं बूक

धर्मेंद्र यांची सिनेकारकीर्द जेवढी यशस्वी ठरली तितकेच त्यांचे खासगी जीवनही चर्चेत राहिले. त्यांनी दोन विवाह केले होते. पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी अभिनेत्री हेमा मालिनी. त्यांना हेमा मालिनी यांच्यापासून ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.

दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या 'जीना इसी का नाम है' या चॅट शोमधील एक मजेदार किस्सा सध्या व्हायरल होत आहे. जो धर्मेंद्र यांच्या प्रेमाची आणि खासगी आयुष्याला महत्त्व देण्याच्या वृत्तीची जाणीव करून देतो.

काय आहे किस्सा? 

शोमध्ये हेमा मालिनी यांच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितले की, जेव्हा ईशा देओलचा जन्म झाला, तेव्हा आनंदाच्या भरात धर्मेंद्र यांनी मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलच्या संपूर्ण 100 खोल्या आरक्षित करून टाकल्या होत्या. हा किस्सा ऐकून हेमा मालिनी हसल्या आणि म्हणाल्या की, डिलीव्हरीनंतर सर्वात आधी त्यांच्या याच मैत्रिणीने ईशाचे तोंड पाहिले होते. यावेळी शोमध्ये उपस्थित असलेली ईशा देओल फक्त लाजून हसत होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com