Dharmendra News: लोकसभा निवडणूक लढवली अन् खासदारही बनले; तरीही धर्मेेंद्र यांनी अचानक सोडलं राजकारण

Dharmendra Health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेत 2004 साली धर्मेंद्र यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dharmendra Health Update

Dharmendra Political Journey: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल खोट्या अफवा पसरल्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असल्याची माहती दिली.

अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी त्यांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. धर्मेंद्र यांची चर्चा होत असताना त्याच्या करिअरची देखील चर्चा होता आहे. मात्र त्यांनी केवळ अभिनयातच नाही, तर राजकारणात देखील एक छोटा पण महत्त्वाचा प्रवास केला आहे.

बिकानेर सीटवरून लढवली निवडणूक

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेत 2004 साली धर्मेंद्र यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानमधील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी 60 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत खासदारकी मिळवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे रामेश्वर लाल डूडी यांना पराभूत केले होते. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांच्या विजयासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने प्रचार केला.

(नक्की वाचा- Dharmendra Health Updates: सलमान, शाहरूख, गोविंदासह अनेक सेलिब्रिटी भेटीला, सनी देओलच्या टीमने सांगितलं...)

राजकारणातून का घेतली माघार?

धर्मेंद्र यांनी राजकारणात प्रवेश केला असला तरी, त्यांना राजकारणाचे वातावरण फारसे आवडले नाही. ज्यावेळी ते निवडून आले, त्यावेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. ज्यामुळे त्यांचे राजकीय मार्ग कठीण झाले. ते आपला जास्तीत जास्त वेळ मुंबईत राहत असल्याने मरदारसंघात त्यांचा दुर्लक्ष होत असे. अशात त्यांच्या बिकानेर मतदारसंघातील जनता त्यांच्यावर नाराज होती.

Advertisement

यामुळेच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी राजकारणाला कायमचा निरोप दिला. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, राजकारण त्यांच्या स्वभावाला योग्य नव्हते. त्यांनी बिकानेरच्या जनतेसाठी अनेक चांगली कामे केली, पण त्याचे श्रेय मात्र इतर कोणीतरी घेऊन गेले, अशी त्यांची तक्रार होती.

(नक्की वाचा-  Dharmendra : हॉटेलच्या रुममध्ये दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत धर्मेंद्रला रंगेहात पकडलं; फोटोमुळे उडाली होती खळबळ)

धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांचा राजकीय प्रवास

धर्मेंद्र यांनीच नव्हेत तर त्यांचे पुत्र सनी देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनीही राजकारणात नशीब आजमावले आहे. सनी देओलने भाजपच्या तिकिटावर गुरदासपूर जागेवरून निवडणूक लढवली, परंतु त्यानेही आता राजकारणापासून अंतर राखले आहे. पत्नी हेमा मालिनी या मात्र आजही राजकारणात सक्रिय आहेत.

Advertisement