जाहिरात

Dharmendra Video : धर्मेंद्र अंथरुणाला खिळलेले, पत्नीचा आक्रोश; भावुक करणारा Video पहिल्यांदाच आला समोर

धर्मेंद्र यांची स्थिती कशी आहे? आपल्या स्टार हिरोला अशा अवस्थेत पाहणं चाहत्यांना नक्कीच कठीण जात असेल.

Dharmendra Video : धर्मेंद्र अंथरुणाला खिळलेले, पत्नीचा आक्रोश; भावुक करणारा Video पहिल्यांदाच आला समोर

Dharmendra hospital video Viral : सिनेस्टार, कित्येक दशकं चित्रपटसृष्टी गाजवणारा आणि खुल्या मनाचा माणूस अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला. ८९ व्या वर्षापर्यंत हिमॅन प्रचंड अॅक्टिव्ह होते. धर्मेंद्र या वयातही विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. गेल्या ७० वर्षांचा अभिनेत्याच्या करिअरचा कॅनव्हास पाहिला तर धर्मेंद्र यांची क्रेझ वाढतच गेली. अशा आपल्या हिरोला रुग्णालयात अंथरुणाला खिळलेलं पाहून कोणत्याही चाहत्याला अश्रू अनावर होतील. 

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे काही दिवस उपचार केल्यानंतर काल १२ नोव्हेंबरला सकाळी ७.३० च्या दरम्यान त्यांना घरी शिफ्ट करण्यात आलं. येथेच त्यांच्यावर उपचार घेण्यात येणार असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. 

Dharmendra : धर्मेंद्रचा एकही रुपया हेमा मालिनीला मिळणार नाही? ४५० कोटींपैकी कोणाला सर्वाधिक भाग, कायदा काय सांगतो?

नक्की वाचा - Dharmendra : धर्मेंद्रचा एकही रुपया हेमा मालिनीला मिळणार नाही? ४५० कोटींपैकी कोणाला सर्वाधिक भाग, कायदा काय सांगतो?

धर्मेंद्र बेडला खिळलेल्या अवस्थेत, पहिल्या पत्नीचा आक्रोश...

दरम्यान धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ रुग्णालयाचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांचे दोन्ही पुत्र बॉबी देओल, सनी देओल आणि धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीच्या मुलीही दिसत आहेत. याशिवाय या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरही दिसत आहेत. त्या धर्मेंद्र यांच्या छातीवर डोकं ठेवून रडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ भावुक करणारा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते धर्मेंद्र यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत. धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलही भावनिक झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

(NDTV मराठी या व्हिडिओची पुष्टी करीत नाही.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com