Dharmendra News: बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. केवळ त्यांचे कुटुंबीयच नव्हे तर चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. आवडत्या कलाकाराचं अंतिम दर्शन न मिळाल्याने चाहते नाराज झाले आहेत. सेलिब्रिटींसह चाहते देखील सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित पोस्ट शेअर करुन आठवणींना उजाळा देत आहेत. तसंच ही-मॅनबाबत वेगवेगळी माहिती इंटरनेटवर शोधत आहेत. यादरम्यान त्यांच्या जुहूतील आलिशान बंगल्याबाबतची माहिती समोर आलीय, जो त्यांनी अतिशय कमी किंमतीत खरेदी केला होता, आज त्याच मालमत्तेची किंमती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
धर्मेंद्र यांचा कोट्यवधी रुपयांचा बंगला
http://www.myneta.info या संकेतस्थळावरील माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या नावावर मुंबईतील जुहू परिसरामध्ये बंगला आहे. हा बंगला त्यांनी 1 कोटी 59 लाख 80 हजार 288 रुपयांमध्ये खरेदी केला होता. आज याच बंगल्याची किंमत जवळपास दीडशे कोटी रुपये असल्याचे सांगितले जातंय.
(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटला पाहून चाहते झाले भावुक, व्हिडीओ होतोय व्हायरल)
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नेटवर्थ किती आहे?
धर्मेंद्र जवळपास 450 कोटी रुपयांचे मालक होते. त्यांची पत्नी आणि खासदार हेमा मालिनी या देखील कोट्यवधी रुपयांच्या मालकीण आहेत. http://www.myneta.info वेबसाइटवरील माहितीनुसार, हेमा मालिनी 278 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. खंडाळा परिसरामध्ये त्यांची 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बिगरशेतीची जमीन आहे. तर धर्मेंद्र यांच्या नावे 9 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बिगरशेती जमीन आहे. धर्मेंद्र यांच्या आलिशान बंगल्याबाबत सांगायचं झालं तर जुहूमधील ही वास्तू 14,171चौरस फूट परिसरात पसरलेलीय.
(नक्की वाचा: Dharmendra: मौसमी चॅटर्जींचा थेट नकार, सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले घरी; मागेल ती किंमत द्यायला झाले तयार)