जाहिरात

Dharmendra: धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटला पाहून चाहते झाले भावुक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Dharmendra Doppelganger: धर्मेंद्र यांचे निधन झालं असलं तरीही त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या डुप्लिकेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Dharmendra: धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटला पाहून चाहते झाले भावुक, व्हिडीओ होतोय व्हायरल
"Dharmendra Doppelganger: धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटचा व्हिडीओ व्हायरल"

Dharmendra News: धर्मेंद्र आजही सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्यांच्या यादीमध्ये गणले जातात. 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झालं, पण चाहत्यांना अखेरचं दर्शन न मिळाल्याने ते दुखावले आहेत. चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यादरम्यान धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक चाहता धर्मेंद्र यांच्या 'आन मिलो सजना' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसतोय. 

(नक्की वाचा :Dharmendra: मी धर्मेंद्रसारखा लालची नाही...कोणत्या अभिनेत्यानं केले होते हे विधान? पडत्या काळात मदतीलाही धावले)

या व्यक्तीचा चेहरा धर्मेंद्र यांच्याशी थोडासा मिळताजुळता आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते भावुक होतायेत. पण धर्मेंद्र यांचे कट्टर चाहते हा व्हिडीओ पाहून खूश झालेले नाही. धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाशी कोणीही बरोबरी करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणंय. कित्येक युजर्संनी थेट लिहिलंय की, धर्मेंद्र यांचा मोठ्या पडद्यावरील लुकची सहजासहजी कोणीही नकल करू शकत नाही. तर 'या व्यक्तीमध्ये धरम पाजींची झलक दिसतेय', असं काहींचं म्हणणंय. व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय.   

Dharmendra: मौसमी चॅटर्जींचा थेट नकार, सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले घरी; मागेल ती किंमत द्यायला झाले तयार

(नक्की वाचा: Dharmendra: मौसमी चॅटर्जींचा थेट नकार, सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले घरी; मागेल ती किंमत द्यायला झाले तयार)

24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचे निधन

धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. ऑक्टोबर महिना अखेरीस त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. यादरम्यान 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि घरामध्ये उपचार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. पण 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com