Dhurandhar 2 Movie: 'धुरंधर 2' सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. सिनेमाच्या कथेपासून ते पात्रांपर्यंत सर्वच गोष्टींवर प्रेक्षक भरभरून बोलत आहेत. या सिनेमात अशा अनेक भूमिका आहेत, ज्यांनी मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली आहे, त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता मुस्तफा अहमद. मुस्तफा अहमदनं सिनेमात रणवीर सिंगचा विश्वासू व्यक्ती 'रिझवान'ची भूमिका साकारली आहे. मुस्तफा अहमदची प्रेरणादायी कहाणी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सिनेमात येण्यापूर्वी मुस्तफा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर होता, ज्याने बॉलिवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले आहे.
एका महिलेने बदलले आयुष्य
मुस्तफा अहमद हा मूळचा अफगाण वंशाचे आहे. बालपणी त्याला 'तारे जमीन पर' सिनेमातील मुलाप्रमाणेच 'डिस्लेक्सिया' (वाचण्या-लिहिण्यात अडचण) समस्येचा सामना करावा लागला होता. अभ्यासात गती नसल्यामुळे त्याने शाळा सोडली, पण खेळ आणि डान्समध्ये तो पटाईत होता. वर्ष 2001 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तो कॉल सेंटरमध्ये सर्वात तरुण 'टीम लीडर' बनला आणि चांगली कमाई करू लागला. दरम्यान जिममध्ये सराव करताना त्याने एका महिलेला मदत केली, ज्या महिलेने नंतर पत्राद्वारे त्याला कळवलं की जिममुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला आहे. या घटनेनंतर मुस्तफाला जाणवले की फिटनेस हेच त्याचे खरे क्षेत्र आहे. त्याने आपली नोकरी सोडली, त्याच्या या निर्णयास कुटुंबाने विरोध केला, आईने तर त्याच्याशी बोलणेही बंद केले होते.
(नक्की वाचा: Dhurandhar 2: दाऊद इब्राहिम जिवंत आहे की मृत? 'धुरंधर 2' मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा चर्चा सुरू)
(नक्की वाचा: Dhurandhar 2 म्हणजे मुस्लीम विरोधाचं विष कालवण्याचे काम! पंतप्रधानांचे नाव घेत पवारांच्या सहकाऱ्याचा थेट आरोप)
महिन्याला 400 तास करायचा काम
सुरुवातीला दिल्लीच्या जनकपुरी येथील जिममध्ये त्याने महिना अवघ्या 10 हजार रुपयांवर काम केले. तो पहाटे 4 वाजता उठून जिम उघडत असत. पुढे 'फिटनेस फर्स्ट'मध्ये त्याला चांगली संधी मिळाली. आपल्या मेहनतीच्या जोरावर तो आशियातील नंबर 1 ट्रेनर बनला. तो महिन्यातून 400 तास काम करायचे आणि दिवसाला फिटनेसचे 14 सत्रे (sessions) घ्यायचे. 2015 मध्ये हृतिक रोशन त्याचा पहिला सेलिब्रिटी क्लायंट बनला. त्यानंतर त्यानं 'पद्मावत' सिनेमासाठी रणवीर सिंग, 'आर्टिकल 370' सिनेमासाठी यामी गौतम आणि 'सरदार उधम' सिनेमासाठी विकी कौशलला प्रशिक्षण दिले. सध्या ते ऑनलाइन कोचिंग देखील करतात. दिग्दर्शक आदित्य धरने त्याला अभिनयाची संधी दिली. आदित्यने आपल्याला विश्वास आणि मैत्री दिली, असे मुस्तफाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे. सिनेमातील मुस्तफाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे.