'धुरंधर' अर्जुन रामपालचं पहिल्या पत्नीसोबत का बिनसलं? 'या' अभिनेत्रीनं मोडला दोघांचा 20 वर्षांचा संसार?

अर्जुनने त्याची खास मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत साखरपुडा करणार असल्याची आनंदाची बातमी नुकत्याच चाहत्यांना दिली आहे. पण याचदरम्यान अर्जुनच्या पहिल्या लग्नाच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Arjun Rampal First Wife Mehr Jesia
मुंबई:

Arjun Rampal And Mehr Jesia Divorced Reason : 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या स्पाय-अॅक्शन चित्रपट ‘धुरंधर' मध्ये मेजर इकबालची भूमिका साकारून अर्जुन रामपालने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.विशेषतः 26/11 हल्ल्याच्या दृश्यातील अर्जुनच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं जात आहे. अर्जुनने त्याची खास मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत साखरपुडा करणार असल्याची आनंदाची बातमी नुकत्याच चाहत्यांना दिली आहे. दोघे सहा वर्षांपासून एकत्र आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत. अरिक आणि अरिव अशी या मुलांची नावे आहेत. रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर अर्जुनच्या एंगेजमेंटची माहिती समोर आली.अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीचे नावही चर्चेत आले. अर्जुन रामपालची एक्स पत्नी आहे तरी कोण? जाणून घेऊयात. 

मेहर जेसिया कोण आहेत?

मेहर जेसिया 80 च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होत्या.त्यांनी 'फेमिना मिस इंडिया'हा किताब जिंकला आणि त्यानंतर त्या सुपरमॉडेल बनल्या. 1986 मध्ये जेसिया यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. जेसियांचा त्या काळात पहिल्या पिढीतील भारतीय सुपरमॉडेल्समध्ये समावेश होता. त्यांनी माधु सप्रे,फिरोज गुजराल,श्यामोली वर्मा यांसारख्या मॉडेल्ससोबत मिळून भारतीय फॅशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.मेहर यांच्या सुंदर चेहऱ्याच्या रेषा,ग्रेस आणि आत्मविश्वास यामुळे त्या वेगळ्या ठरल्या.तसच जेसिया अनेक मासिकांच्या कव्हर्सवर झळकल्या आणि मोठ्या डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केला.

नक्की वाचा >> चर्चा तर होणारचं! वानखेडेत सचिन-मेस्सीनं एकमेकांना दिलं 'हे खास गिफ्ट, यात लपलंय 1 सीक्रेट, तुम्ही पाहिलं का?

मेहर आणि अर्जुनची लव्ह स्टोरी आणि मग लग्न

दोघेही मॉडेलिंगच्या पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्या काळी त्यांच्या अफेअरच्या बातमीचं कुणालाही आश्चर्य वाटले नाही. 1998 मध्ये 24 वर्षांच्या वयात अर्जुनने मेहरसोबत लग्न केले. ते इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जात होते. महिका आणि मायरा अशी त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत. 

Advertisement

20 वर्षांनंतर झाला घटस्फोट

अर्जुन आणि जेसिया यांचं नातं दोन दशकांपर्यंत मजबूत होतं. पण त्या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. त्यांनी एक निवदेन जाहीर करत घटस्फोटाबाबत माहिती दिली होती. पण हे कपल विभक्त का झाले,यामागचं कारणं समोर आलं नाही.अर्जुनचं सुजैन खानसोबत अफेअर होतं, अशा चर्चा रंगल्या होत्या.

नक्की वाचा >> Video: लग्नासाठी उरले होते 2 तास, BF ला रस्त्यावर पाहताच नवरीचं हृदय धडधडलं, कारमधून खाली उतरताच जे घडलं..

एका रिपोर्टनुसार,दोघेही गुपचूप भेटत असल्याचं मेहरला समजलं होतं. यामुळे त्या खूप दु:खी झाल्या होत्या.त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण होत गेला. त्यांच्यातील वाद इतका वाढला की, शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकीही त्यांना दिली होती.त्यानंतर अर्जुन काही काळा वेगळं राहिला. पण अखेरीस दोघांचं नातं तुटलं. 

Advertisement