Bride Meet Ex Boyfriend Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लग्नला अवघे 2 तास उरले असतानाच एक सजलेली नवरी रस्त्यावर उभ्या असलेल्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटते. एक्सला भेटल्यानंतर तिचे डोळे पाणावतात आणि नंतर ती कारमध्ये येऊन बसते. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक्स बॉयफ्रेंडला पाहताच नवरीनं असं काय केलं, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाहा नवरीच्या लव्ह स्टोरीचा हा भन्नाट व्हिडीओ.
पहिलं प्रेम विसरणं सोपं नसतं असं म्हणतात...असाच काहीसा प्रकार या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. लग्नाच्या 2 तास आधीच नवरीचं मन डळमळलं आणि तिने पुन्हा एकदा प्रेमाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कारमधून प्रवास करत असताना नवरीनं रस्त्यावरच तिच्या प्रियकराची भेट घेतली. त्यानंतर नवरीच्या डोळे पाणावले आणि ती पुन्हा कारमध्ये परत आली. तेव्हा ती एक प्रेयसी नव्हती, तर फक्त एक नवरी होती. जाणून घ्या तिच्या शेवटच्या भेटीची अनोखी कहाणी..
व्हायरल व्हिडीओला 31 मिलियनहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडिओ 13 डिसेंबर रोजी @chalte_phirte098 नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला होता, जो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, याला 31.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर 30 हजारांहून अधिक लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "प्लीज शेवटचा एकदा त्याला भेटवून दे... ", त्यासोबत ब्रोकन हार्ट इमोजी आणि डोळ्यांतून अश्रू वाहणाऱ्या इमोजीही लावण्यात आल्या होत्या.
व्हिडीओला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
व्हायरल क्लिपमध्ये नवरीच्या वेषात एक महिला दिसते. तिच्यासोबत तिचा मित्र आहे. दोघे कारने एका ठिकाणी पोहोचतात. मुलगी कॉलवर आहे आणि पूर्वीच्या प्रियकराला भेटण्याची जागा ‘वैष्णव केमिस्ट' असल्याचे सांगते. जेव्हा महिला कारमधून उतरते, तेव्हा तो व्यक्ती सांगतो की या मुलीच्या लग्नासाठी फक्त 2 तास शिल्लक राहिले आहेत. ती ‘एक्स'ची शेवटची भेट घ्यायला आली आहे. या व्हिडीओला कमेंट्स करत यूजर्सने म्हटलंय, जेव्हा इतकं प्रेम होतं, तेव्हा लग्न का नाही केलं?, दुसऱ्या यूजरने म्हटलंय, बिचाऱ्या नवऱ्यासाठी वाईट वाटतंय. काही यूजर्सने असंही म्हटलंय की, हा स्क्रिप्टेड व्हिडीओ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world