Dhurandhar Box Office Collection Day 2: दिग्दर्शक आदित्य धरचा बहु-स्टारर चित्रपट "धुरंधर"चा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त सुरुवात केली त्यानंतर दुसऱ्या दिवशीही मोठी कमाई केली आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन सारखे स्टार अभिनीत हा चित्रपट पहिल्या दिवशीच वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला, तर दुसऱ्या दिवशीच्या कमाईने कांतारालाही जबर धक्का दिला.
'धुरंधर'ची जबरदस्त कमाई
धुरंधर चित्रपटाची क्रेझ इतकी होती की एडव्हान्स बुकिंगमध्येच 23 कोटी कमावले. 280 कोटी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 5,000 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी कमाईच्या बाबतीत त्याने अहान पांडे आणि अनित पद्डा यांच्या "सैयारा" ला मागे टाकले. या वादळामुळे धनुष आणि कृती सॅनन यांच्या "तेरे इश्क में" चेही मोठे नुकसान होऊ शकते.
याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल
सॅनिकच्या मते, 'धुरंधर' ने भारतात पहिल्या दिवशी 27 कोटी रुपये कमावले. आणि पहिल्या शनिवारी म्हणजे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे 31 कोटी रुपये कमावले. याचा अर्थ सध्या एकूण कमाई सुमारे 58 कोटी रुपये आहे. हा चित्रपट एक-दोन दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल आणि लवकरच त्याचे बजेट वसुल करेल अशी अपेक्षा आहे.
'धुरंधर'चा 'कांतारा चॅप्टर 1' ला धप्पा
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' ने ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' पेक्षा तिप्पट कमाई केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सुपरहिट चित्रपटाने दुसऱ्या दिवशी सर्व भाषांमध्ये 45.4 कोटी रुपये कमावले. हिंदीमध्ये, या चित्रपटाने फक्त ₹12.5 कोटी कमावले, जे धुरंधरच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा खूपच कमी होते आणि या बाबतीत, रणवीरचा चित्रपट अधिक हीट ठरला आहे.
Kapoor Family Education: राज कपूर ते रणबीर कपूर... कपूर घराण्यात कोण किती शिकलंय?
दरम्यान, धुरंधरच्या जगभरातील कलेक्शनचा अंदाज लावला तर, पहिल्या दिवशी तो ₹40 कोटी होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा एकूण कलेक्शन अंदाजे ₹44 कोटींवर पोहोचला. परदेशात त्याने अंदाजे ₹10 कोटी आणि दुसऱ्या दिवशी देशभरात ₹35 कोटी कमावले.