हिंदी चित्रपटसृष्टीत 'कपूर' घराण्याची वेगळी ओळख आहे. कपूर कुटुंबाने अभिनयाच्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पिढ्यानपिढ्या मनोरंजन क्षेत्रात असलेल्या या कुटुंबातील सदस्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी देखील तितकीच मनोरंजक आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा शिक्षणाचा प्रवास कसा होता, याबद्दल जाणून घेऊया.
पृथ्वीराज कपूर : कपूर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले पृथ्वीराज कपूर यांनी लायलपूर खालसा कॉलेजमधून आपले शिक्षण सुरू केले आणि त्यानंतर पेशावरच्या एडवर्ड्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) ची पदवी पूर्ण केली. अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ वकिलीचे शिक्षण देखील घेतले होते.
राज कपूर :'हिंदी सिनेसृष्टीतील शोमॅन' म्हणून ओळखले जाणारे राज कपूर लहान वयातच चित्रपटसृष्टीत आले. त्यामुळे त्यांचे अधिकृत शिक्षण मर्यादित राहिले. मात्र, त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल , सेंट झेवियर्स कॉलेजिएट आणि कॅम्पियन स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सेटवर काम करत असतानाच दिग्दर्शन आणि अभिनयाच्या बारकावे शिकले.
(नक्की वाचा- क्रिकेटरच्या प्रेमात पडली Bigg Boss ची 'ही' स्पर्धक! पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार?)
शम्मी कपूर : राज कपूर यांचे बंधू शम्मी कपूर यांनी न्यू एरा स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ रुईया कॉलेजमध्ये देखील प्रवेश घेतला. मात्र, पृथ्वी थिएटर आणि चित्रपटांमध्ये अधिक रस असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले.
शशी कपूर : शशी कपूर यांनी डॉन बॉस्को हायस्कूल आणि मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, पण थिएटर आणि चित्रपटांवरील त्यांच्या आवडीमुळे त्यांनी फारसे शिक्षण घेतले नाही.
रणधीर कपूर : पुढील पिढीतील रणधीर कपूर यांनी डेहराडूनच्या कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पुढील शिक्षणाची फारशी माहिती उपलब्ध नाही.
बबीता आणि नीतू कपूर : बबीता कपूर यांनी पाचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. नीतू कपूर यांनी मुंबईतील हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
(नक्की वाचा- Indigo Flights Crisis: देशांर्गत प्रवासासाठी 4.2 लाख खर्च, गायक राहुल वैद्यने डोक्यालाच हात लावला)
रणबीर, करीना आणि करिश्मा : रणबीर, करीना आणि करिश्मा कपूर या तिघांनीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतले असले तरी, अभिनयाच्या कारकिर्दीला लवकर सुरुवात केल्यामुळे ते त्यांच्या पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.
सर्वात जास्त शिकलेल्या रिद्धिमा कपूर
कपूर कुटुंबात सर्वात जास्त शिकलेल्या सदस्या म्हणून रिद्धिमा कपूर यांना ओळखले जाते. त्यांनी लंडनच्या अमेरिकन इंटरकाँटिनेंटल युनिव्हर्सिटीमधून डिझायनिंग आणि मार्केटिंगमध्ये बॅचलर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी जेमोलॉजीचे कोर्स देखील पूर्ण केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world