जाहिरात
Story ProgressBack

'बाईपण भारी' नंतर आता आईपण भारी! केदार शिंदे सांगणार नवी गोष्ट

Read Time: 2 min
'बाईपण भारी' नंतर आता आईपण भारी! केदार शिंदे सांगणार नवी गोष्ट
मुंबई:

केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं सामान्य प्रेक्षकांसह समीक्षकांचीही पसंती मिळवली होती. 'बाईपण भारी' यशानंतर 'आईपण भारी देवा' हा नवा सिनेमा घेऊन येणार आहेत. स्वत: केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिलीय. 

एका बाईचं आयुष्यातील महत्व आणि ती दैनंदिन साकारत असलेली भूमिका या  सगळ्याच महत्व आणि चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आलं होतं. प्रत्येक महिलेला आपली वाटणारी गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आलीय. त्याचबरोबर प्रत्येक वयोगाटतील महिलेशी संबंधित किस्सेही यामध्ये आहेत. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर केदार शिंदा 'आईपण भारी देवा' हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमात ते कोणती गोष्ट सादर करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

 'बापपण भारी' का नाही?

केदार शिंदे यांचे बहुतांश चित्रपट हे महिला वर्गाचे विषयांवर आधारित असतात. 'आईपण भारी'चं पोस्टर प्रदर्शित होताच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेक पुरुषांनीही याचं कौतुक केलंय. तर काही जणांनी यावेळी शिंदे यांना प्रश्नही विचारलाय. पुरुषांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट केंव्हा दिग्दर्शित करणार असा प्रश्न या प्रेक्षकांनी केदार यांना विचारला आहे. 

'बाईपण'चा सिक्वेल?

एखादा चित्रपट गाजल्यनंतर त्याचा पुढचा भाग (सिक्वेल) काढण्याची चित्रपटसृष्टीत परंपरा आहे.  'अगंबाई अरेच्च्या' हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अगंबाई अरेच्च्या 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता 'बाईपण भारी देवा' च्या यशानंतर येणारा 'आईपण भारी देवा' हा या चित्रपटाचाच सिक्वेल

एखादा चित्रपट गाजला कि त्याचा सिक्वेल काढण्याची परंपरा चित्रपटसृष्टीत चांगलीच रुळली आहे. अगंबाई अरेच्च्या हा चित्रपट केदार शिंदेंनी दिग्दर्शित केला, जो प्रचंड हिट झाला. नंतर त्याचा सिक्वेल काढला गेला, अगंबाई अरेच्च्या २. आता बाईपण भारी देवा हा चित्रपट हिट गेला, आता कदाचित या चित्रपटाचं सिक्वेल म्हणजे आईपण भारी देवा असू शकतं अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता सर्वांना या नवीन चित्रपटाची उत्सुकता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination