जाहिरात

VIDEO: 'साडीत उंदीर, डासांचा त्रास...' बालगंधर्व रंगमंदिराची अशी दुरावस्था, मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली

Actress Amruta Deshmukh Angry VIDEO: इतके घाणेरडे वॉशरुम, बाथरुम असतात. स्टेजच्या पाठीमागे त्याचा वास येत असतो, असं म्हणत अभिनेत्रीने अस्वच्छतेवरुन पालिका प्रशासनची पोलखोल केली. 

VIDEO: 'साडीत उंदीर, डासांचा त्रास...' बालगंधर्व रंगमंदिराची अशी दुरावस्था, मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली

Actress Amruta Deshmukh On Balgandharva Theatre Management: सध्या पुण्यात महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार नागरिकांवर आश्वासनांची खैरात करत आहेत. मात्र, दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्राकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मार्च २०२४ मध्ये बालगंधर्व रंगमंदिराचा कायापालट करण्यात आला, परंतु लाखो रुपये खर्च करूनही येथील मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. यावरुनच मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने फेसबूक लाईव्ह करत संताप व्यक्त केला.

OTT Release: अख्खा देश हादरवणाऱ्या 5 हत्या.. 9.7 रेटिंग, सत्य घटनांवरील 'ही' भयावह सिरीज पाहिली का?

बालगंधर्वमधील अस्वच्छतेवरुन अभिनेत्रीचा संताप

मराठी अभिनेत्री अमृता देशमुखच्या नियम व अटी लागू या नाटकाचा प्रयोग पुण्यामध्ये सुरु आहे. रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे  नाटकाच्या प्रयोगासाठी आलेल्या अमृता देशमुखने फेसबुक लाईव्ह करत तेथील अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित केला. पुण्यात असे अनेक थिएटर्स आहेत जे अतिशय छान ठेवलेले असतात, मात्र बालगंधर्व रंगमंदिराची नेहमीची रडारड आहे. इतके घाणेरडे वॉशरुम, बाथरुम असतात. स्टेजच्या पाठीमागे त्याचा वास येत असतो, असं म्हणत अभिनेत्रीने अस्वच्छतेवरुन पालिका प्रशासनची पोलखोल केली.

"जे व्हिआयपी रुमची सजावट करुन तिथे जौ पेसा ओतला जातो ना त्यापेक्षा या रुम्स, वॉशरुमची मॅनेजमेंट सुधारावी एवढी माफक अपेक्षा आहे. इथले कर्मचारीही कार्यक्रम सुरु होण्याच्या आधी आत्ता पोहोचलेले आहेत," असे म्हणत अमृता देशमुखने फेसबूक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली आहे. यावेळी अभिनेत्रीने सफाई कर्मचाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. 

ही परिस्थिती कधी बदलणार? 

"कार्यक्रमाला येणाऱ्या व्हीआयपी लोकांसाठी सुसज्ज कक्ष असतात, मग रंगकर्मींच्या बाबतीत असा दुजाभाव का केला जातो? "नाटक सुरू असताना प्रेक्षकांच्या पायावरून उंदीर जातात, डास चावतात. प्रेक्षक नाटकाच्या प्रेमापोटी येतात, पण त्यांना गृहीत धरायचे का? सांस्कृतिक शहर म्हणायचं आणि तिथल्या एका नावाजलेल्या नाट्यगृहाची ही अवस्था? ही परिस्थिती कधी बदलणार?" अशा शब्दात अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com