'...तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा असचं होतं'; दिग्दर्शकाच्या प्रश्नावर लक्ष्याच्या लेकाचं लाखमोलाचं 'उत्तर'

अभिनय बेर्डे अभिनित आणि क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित चित्रपट 'उत्तर' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झाला आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे मुख्य भूमिका साकारत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

अभिनय बेर्डे अभिनित आणि क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित चित्रपट 'उत्तर' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झाला आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे मुख्य भूमिका साकारत आहेत. आई-मुलाच्या नात्यातील गोड-कडू क्षण कथन करणाऱ्या या चित्रपटासाठी अभिनय बेर्डेने खूप मेहनत घेतली. पुण्यातील थिएटरबाहेर हाऊसफूल्लचा बोर्ड लागल्यानंतर स्वत: दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी एक पोस्ट लिहिल अभिनयचं कौतुक केलं. 

या चित्रपटासाठी अभिनयने १२-१३ किलो वजन कमी केलं. सुरुवातीला अभियलला टार्गेट केलं जात होतं. अभिनय शब्दावरुन कोटी करून त्याला चिडवलं जात होतं. मात्र या चित्रपटातून अभिनयने सर्वांचं तोंड बंद केलंय. चित्रपटाचं कौतुक होत असताना क्षितिज त्याला म्हणाला, "तुझ्यावर लोकं एवढं प्रेम करतात, याचाही बाकीच्यांना त्रास होत असेल की! आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा असचं होतं!" त्यावर तो म्हणाला "आपल्या क्षेत्रात एकतर उगवतीचा किंवा मावळतीचा सूर्य बघायला आवडतो सर, दुपारी १२ चा कोणाला नको असतो!" तो सत्तावीस चा आहे पण सत्तरीच्या अनुभवासारखं बोलला.

क्षितिज पटवर्धनची संपूर्ण पोस्ट...

सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत थांबलो होतो... 
अभिनयला मी कास्ट केलं तेव्हा खूप भुवया उंचावल्या होत्या. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर त्याला टार्गेट केलं, (ज्यात आमच्या क्षेत्रातली सुद्धा लोकं होती) 'अभिनय' शब्दावर कोटी करून तुला हे जमत नाही, ते जमत नाही वगैरे बडबड केली पण आम्ही दोघेही शांत राहिलो. दहा महिने फक्त निनाद कसा असेल, कसा बोलेल, बघेल, वागेल यावर काम केलं, त्याने कठोर मेहनत घेऊन १२ -१३ किलो वजन कमी केलं आणि काल जेव्हा हाऊसफुल गर्दीतून "नन्या superb!" अशी दिलखुलास आरोळी आम्ही ऐकली तेव्हा एकमेकांकडे फक्त पाहिलं आणि हसलो. त्याला लोकांचा गराडा पडला. मी बाजूला झालो. अनेक आया त्याच्याशी बोलता बोलता रडायला लागल्या आणि पुढे अर्धा तास मी हे सुखावून टिपत राहिलो. सगळ्या परीक्षणांमध्ये त्याचं भरभरून कौतुक आलंय,  दोनच दिवसात मराठीतले उत्तमोत्तम दिग्दर्शक त्याचं काम बघून खुश झालेत आणि त्याला 'डिस्कव्हरी' म्हणतायत आणि प्रेक्षक तर त्याला आपला घरचाच मुलगा मानतात, त्यामुळे त्याच्या यशाने ते ही आनंदून गेलेत याची जाणीव काल पुन्हा एकदा लख्खपणे झाली. 

Advertisement

नक्की वाचा - ...म्हणून अक्षयच्या आईने वेगळं होण्याचा निर्णय घेतला; विनोद खन्ना यांची पहिली पत्नी कशी दिसायची? पाहा 5 फोटो


टिपिकल पुणेरी मराठी मुलाचा मोल्ड आम्हाला मोडायचा होता, तरुण पिढीला आपला वाटेल असा नवा इंजिनिअर उभा करायचा होता आणि मराठीत दीर्घ पल्यात काम करू शकेल असा नायक दाखवायचा होता त्याची ही सुरुवात आहे. काल हाऊसफुल शोज ना जाऊन आल्यानंतर मी म्हणलं "तुझ्यावर लोकं एवढं प्रेम करतात, याचाही बाकीच्यांना त्रास होत असेल की! आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा असचं होतं!" त्यावर तो म्हणाला "आपल्या क्षेत्रात एकतर उगवतीचा किंवा मावळतीचा सूर्य बघायला आवडतो सर, दुपारी १२ चा कोणाला नको असतो!" तो सत्तावीस चा आहे पण सत्तरीच्या अनुभवासारखं बोलला.

त्याला जे मिळतंय ते फार कमी लोकांना मिळतं कारण कदाचित त्याने जे पाहिलंय ते फार कमी लोकांनी पाहिलंय! तेवढी शक्ती, संयम आणि तयारी त्याच्यात आहे, म्हणूनच वाटतं अभिनय, जिथे कुठे असतील, लक्ष्मीकांत सरांना तुझा प्रचंड अभिमान वाटत असणारे! तू जे काम केलंयस त्या इतकाचं तू जसं हे सगळं हाताळलं आहेस त्याचा सुद्धा! 
Love you for what you are!

Advertisement