Exclusive : निपुण धर्माधिकारीने मराठी सिनेमाबाबत केली मोठी भविष्यवाणी

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : अभिनेता - दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

NDTV Marathi Entertainment Awards 2025 :  एनडीटीव्ही मराठीचा पहिलावहिला एंटरटेन्मेंट अवॉर्ड सोहळा दणक्यात पार पडला. या सोहळ्यामध्ये मराठी विश्वातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. लंपन या वेबसीरिजसाठी निपुण धर्माधिकारीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर एनडीटीव्ही मराठीसोबत केलेल्या खास बातचितमध्ये निपुण धर्माधिकारीने मराठी चित्रपटांबाबत बऱ्याच गोष्टी मांडल्या. नेमके तो काय म्हणालाय, जाणून घेऊया सविस्तर....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठी सिनेमांबाबत आपले दिग्दर्शक आणि निर्माते वेगळे काय करत आहेत, असा प्रश्न विचारल्यानंतर निपुण धर्माधिकारी म्हणाला की, "फार पूर्वीपासून मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. खरंतर मराठी चित्रपट हा प्रयोगक्षम चित्रपटसृष्टी आहे आणि तेच आपण पुढे करत राहू, असे मला वाटतंय. मराठी चित्रपट कोणत्याही साच्यामध्ये अडकत नाही. अर्थात त्याला बजेटचा साचा तयार होतो, पण हळूहळू आता तोही मोडायला लागलाय. बोलताना चित्रपटांविषयी, कलाकृतींविषयी आपुलकी बोलणे होत नाही किंवा तुमच्यापेक्षा आम्ही त्यांचे चित्रपट पाहू,असंही होते. पण आपले जे भविष्य आहे, ते आशावादी आहे." 

Advertisement

आता गेम खेळावा लागणाराय - निपुण धर्माधिकारी

दाक्षिणात्य सिनेमांबाबत निपुण म्हणाला की, "आता जे दाक्षिणात्य चित्रपट चालताहेत आणि आपण सगळे जे पाहतो ते वर्षानुवर्षे त्यांच्याकडे असलेली संस्कृती आहे . आपल्याकडे नाटकांची संस्कृती आहे. तिथे लोक पहिल्या आठवड्यात जाऊन सिनेमा पाहतातच, तसे आपल्याकडे नाहीय. आपल्याकडे जे चित्रपट चालत आलेले आहेत, ते पाहण्यासाठी प्रेक्षक तिसऱ्या-चौथ्या आठवड्यामध्ये थिएटरमध्ये जातात. आता जो बिझनेस आहे, तो पहिल्या तीन दिवसांचा बिझनेस झालेला आहे. ते आपल्याला समजायला लागलंय आणि त्या गेमनुसार खेळावं लागणार आहे, आता तर गेम तसा आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे बजेटसह अन्य सर्वच गोष्टी जास्त असतात. ते पूर्णपणे वेगळा विचार करतात, यात काही शंकाच नाही. आपण त्या साच्यामध्ये अडकत नाहीय आणि आपण सतत वेगवेगळे करतोय, असे मला वाटते आहे. तर दोन्ही प्रकारचे सिनेमे आपल्याला पाहायला मिळतील, एक जे त्यांचे अनुकरण करतील आणि एक जे मूळ विचार घेऊन येतील".

Advertisement

(नक्की वाचा: Exclusive फुलवंतीमधील शास्त्रीबुवांची जबाबदारी मोठी होती: गश्मीर महाजनी)

कल्पकता HIकडे आहे - निपुण धर्माधिकारी

ज्या कल्पना मनातूनच येतात, त्या केवळ चित्रपटाशी संबंधित नाही तर चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक शॉर्टमध्ये एक प्रकारची कल्पकता असते, तर ती कल्पकता एआयकडे नसून एचआयकडे म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सकडे आहे त्यामुळे मी तरी अजून एआयला घाबरलेलो नाही, असेही निपुण म्हणाला. 

Advertisement

(नक्की वाचा: Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान)

मराठी भाषेच्या आग्रहाबाबत निपुण काय म्हणाला?

दक्षिणेकडे त्यांच्या भाषांचा आग्रह केला तर मराठीमध्ये तसा केला पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता निपुण म्हणाला की, मुळातच माणसं म्हणून आपण असे बनलेले नाही आणि दक्षिणेप्रमाणे मराठीचा आग्रह धरावा का? तर तो निर्णय प्रत्येकाने स्वतः पुरता घ्यावा. मी माझ्यापुरता हा निर्णय घेतोय की मी जर मराठी भाषेत बोलत असेन तर मी पूर्णपणे मराठी भाषेमध्येच बोलेन.

Video : NDTV Marathi Entertainment Awards 2025 | साऊथचे सिनेमे आणि मराठी चित्रपटांची तुलना योग्य आहे?