जाहिरात

Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कळावे, म्हणून अभिनेता शरद केळकरचे मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार आहे.

Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : एनडीटीव्ही मराठीचा पहिलावहिला एंटरटेन्मेंट अवॉर्ड 24 फेब्रुवारी रोजी पार पडला. सोहळ्यामध्ये मराठी कलाविश्वासह हिंदीतील दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली होती. कार्यक्रमामध्ये ओटीटी, टीव्ही आणि सिनेमामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस अभिनेता शरद केळकरला 'पर्सनॅलिटी ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळेस NDTV Marathiशी साधलेल्या खास संवादादरम्यान त्याने छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कळावे म्हणून हॉलिवूडच्या तोडीची सीरिज तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. शरद केळकर नेमके काय म्हणाला? जाणून घेऊया सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठी लोकांनी देशासाठी काय केलंय हे लोकांना कळतंय : शरद केळकर   

आपले इतिहासातील हीरो लोकांना कळले पाहिजे असे वाटते. गेल्या पाच सहा वर्षांमध्ये असे बरेच सिनेमे आले आहेत, ज्याद्वारे लोकांना इतिहासाबाबत माहिती मिळते. या देशासाठी मराठी लोकांनी काय केलंय, हे कळतंय.  

(नक्की वाचा : गणोजी म्हणून लक्ष्मण उतेकरांनी का कास्ट केले? सारंगने सांगितली Inside Story)

पुस्तकात छत्रपतींबाबत एकही मोठा धडा नाही, शरद केळकरनं व्यक्त केली खंत

माझं शिक्षण मध्य प्रदेशात झाले. आमच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एकही मोठा धडा नव्हता. एक किंवा दोन पानांचे धडे होते. दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात गेलो होतो, त्यावेळेस मुख्यमंत्रीसाहेबांना याबाबत सांगितलं होतं. पण जेव्हा छावासारखे सिनेमे येतात तेव्हा कळतं की महाराजांनी काय-काय केलंय. जर शाळेतल्या मुलांना हे शिकवलं गेले, महाराज कोण होते? ते कसे होते? त्यांनी आपल्यासाठी काय केलंय? तर त्या हिशेबाने हे छान होईल, असे म्हणत शरद केळकरने खंत व्यक्त केली. 

पुढे तो असंही म्हणाला की, "छावा सिनेमाच्या माध्यमातून लोकांना कळतंय की छत्रपती संभाजी महाराजांनी काय केले. त्यांच्या वेदना, त्यांचे बलिदान लोकांना आज कळतंय. कारण लोकांनी फक्त नाव ऐकलं होते. पण आज लोकांना कळतंय बलिदान म्हणजे नेमके काय असते? तानाजी सिनेमाला जसा प्रतिसाद मिळाला होता, तसाच प्रतिसाद छावा सिनेमालाही मिळतोय".   

(नक्की वाचा : प्रेक्षक मला मारायला निघालेत, असे का म्हणाला सारंग साठ्ये?)

महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? 

छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमाची निर्मिती करणार का? असा प्रश्न विचारला असता शरद केळकर म्हणाला की, माझी इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भविष्यात हॉलिवूडच्या तोडीची सीरिज तयार केली पाहिजे. कारण संपूर्ण कथेला सीरिज न्याय देऊ शकेल. एक-दोन सीझनमध्ये सीरिज तयार केली पाहिजे तेव्हा आपण लोकांना दाखवू शकतो की महाराज कोण होते.  

इंडियाज् गॉट लेटेंटवरील प्रतिक्रिया

वादग्रस्त इंडियाज् गॉट लेटेंट कार्यक्रमाबाबत शरद केळकर म्हणाला की, चूक आपलीच आहे. तुम्ही यू-ट्युबवर जे पाहता, जे लाइक करता. त्यामुळे लोकांना जे आवडतं तेच तयार केले जाते. तुम्ही पाहणं बंद करा ते बनवणे बंद करतील.

NDTVMarathiEntertainmentAwards2025|शिवरायांवर चित्रपट बनवायचा नाहीये कारण...असं का म्हणाले शरद केळकर