जाहिरात
This Article is From Aug 06, 2024

मुलीच्या अचानक मृत्यूमुळे अभिनेत्री हादरली, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

मिहीकाच्या मृत्यूचे वृत्त दिव्या सेठ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे.

मुलीच्या अचानक मृत्यूमुळे अभिनेत्री हादरली, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
Mumbai:

90 च्या दशकातील 'देख भाई देख', बॉलीवूडचा गाजलेला चित्रपट 'जब वी मेट' यासारख्या प्रसिद्ध मालिका, चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री दिव्या सेठ यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. विशीतील मिहीका शाह हिचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती कळू शकलेली नाही. काही संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तामध्ये मिहीका हिचा मृत्यू तापानंतर अचानक आलेल्या आकडीमुळे झाल्याचे म्हटले आहे. मिहीकाच्या मृत्यूचे वृत्त दिव्या सेठ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी मिहीकाला देवाज्ञा झाली, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दिव्या यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये मिहीकाचे निधन कशामुळे झाले हे लिहिलेले नाही. काही संकेतस्थळांनी माात्र मिहीकाला ताप आला होता. या तापानंतर तिला आकडी आली आणि त्यातच तिचे निधन झाल्याचे म्हटले आहे. मिहीकाच्या अचानक जाण्याने दिव्या आणि त्यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यातच दिव्या यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट केली होती.  ज्यामध्ये त्यांनी तीन पिढ्या दाखवल्या होत्या. दिव्या सेठ यांची आई सुषमा सेठ या देखील अभिनेत्री आहेत.  सुषमा सेठ यांनी कभी खुषी कभी गम, चल मेरे भाई, कल हो ना हो, नगिना, स्टुडंट ऑफ द इयर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिव्या सेठ यांनी अभिनय क्षेत्रातील सुरुवात हम लोग या मालिकेपासून केली होती. या मालिकेत त्यांनी मझलीची भूमिका साकारली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: