जाहिरात

ना सलमान खान ना सनी देओल, 'या' अभिनेत्याने 7 दिवसात पाकिस्तानला हादरवून सोडले

14 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेली ही 7 भागांची सीरिज अवघ्या 5 दिवसांत पाकिस्तानच्या टॉप 10 यादीत पहिल्या स्थानी पोहोचली.

ना सलमान खान ना सनी देओल, 'या' अभिनेत्याने 7 दिवसात पाकिस्तानला हादरवून सोडले
  • वेब सीरिज तश्करी पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊन अवघ्या पाच दिवसांत टॉपवर आहे
  • इमरान हाश्मीने अर्जुन मीना नावाच्या कस्टम्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे
  • नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही क्राइम थ्रिलर वेब सीरिज पसंती मिळवत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Web Series Tashkari: क्राइम थ्रिलरचा दबदबा सध्या पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सीमावाद सर्वश्रुत असला तरी, भारतीय मनोरंजनाबाबत शेजारील देशात नेहमीच आकर्षण राहिले आहे. सध्या सलमान खान किंवा सनी देओल नव्हे, तर 'सीरिअल किसर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमरान हाश्मीने पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. त्याची 'तश्करी' ही नवीन वेब सीरिज पाकिस्तानात नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे.

14 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेली ही 7 भागांची सीरिज अवघ्या 5 दिवसांत पाकिस्तानच्या टॉप 10 यादीत पहिल्या स्थानी पोहोचली. 'फ्लिक्सपॅट्रोल'च्या आकडेवारीनुसार, 19 जानेवारीपर्यंत ही सीरिज तिथे लोकप्रियतेच्या शिखरावर होती. नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सीरिजमध्ये इमरानने 'अर्जुन मीना' या कस्टम्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करणाऱ्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा हा थरार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

नक्की वाचा - Bapya Movie: 'बाप्या'ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026मध्ये अधिकृत निवड

या सीरिजमध्ये शरद केळकर याने 'बडा चौधरी' या खलनायकाची भूमिका प्रभावीपणे मांडली आहे. तसेच अमृता खानविलकर, नंदीश संधू आणि जया अफरोज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विमानतळावरील तस्करी आणि सिस्टममधील भ्रष्टाचार याचे वास्तववादी चित्रण यामुळे ही सीरिज चर्चेत आहे. मराठी कलाकारांचा डंका यात दिसतो. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये शरद केळकर आणि अमृता खानविलकर या मराठी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शरदने साकारलेला 'बडा चौधरी' हा व्हिलन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. पाकिस्तानी प्रेक्षकांनी या वेब सीरिजच्या कथेची आणि इमरानच्या अभिनयाची तोंडभरून स्तुती केली आहे.

नक्की वाचा: Kangana Ranaut: आयुष्य नरक झालं होतं, 10 वर्षांनंतर Hrithik Roshanसोबतच्या कायदेशीर लढाईवर कंगना राणौतची पोस्ट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com