
Su From So Movie Box Office Collection : 'सू फ्रॉम सो' या कन्नड फिल्मनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा प्रदर्शीत झाल्यापासून 50 दिवसांचा कालावधी उलटला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 120 कोटींचा गल्ला जमवला आहे. ही कमाई एखाद्या सिनेमासाठी मोठं यश मानलं जातं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त केलं आहे. हा सिनेमा ओटीटीवर लवकरात लवकर प्रदर्शीत व्हावा,अशी मागणी प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर केली जात आहे. ज्या लोकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला आहे, त्यांना ओटीटीवरही या सिनेमाची झलक पाहता येणार आहे. तसच ज्यांना थिएटरमध्ये जाणं शक्य होत नाही, अशा लोकांनाही हा सिनेमा ओटीटीवर पाहता येईल. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच या सिनेमाची ओटीटी रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्म दोन्ही कन्फर्म झाले आहेत.
हा सिनेमा कुठे आणि कधी पाहू शकता?
तुम्हालाही हा सिनेमा ओटीटीवर पाहायचा असेल, तर जिओ हॉटस्टारवर हा सिनेमा पाहू शकता. साऊथ इंडियन बॉक्स ऑफिस नावाच्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत पुष्टी करण्यात आली आहे. तुम्ही हा सिनेमा 5 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. राज बी शेट्टी यांनी प्रोड्युस केलेल्या या कॉमेडी फिल्मने 2025 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कन्नड फिल्मचा किताब जिंकला आहे.फिल्ममध्ये शनील गौतम, माईम रामदास आणि प्रकाश थुमिनाड प्रमुख भूमिकेत आहेत.
नक्की वाचा >> Uber ड्रायव्हरने तरुणीला कॉलेजला सोडलं,पण नंतर घडला विचित्र प्रकार, मुलीनं WhatsApp चे स्क्रीनशॉट केले व्हायरल
#Sufromso - Streaming Tonight on #JioHotstar pic.twitter.com/XP6pZT5hb6
— South Indian BoxOffice (@BOSouthIndian) September 4, 2025
सिनेमाने केली जबरदस्त कमाई
या सिनेमाचं बजेट जवळपास साडेपाच कोटी रुपये होतं, असं सांगितलं जात आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीड कोटी रुपयेच खर्च केल्याचं समजते. पण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि 100 कोटींहून अधिकची कमाई केली. विशेष म्हणजे फक्ट कर्नाटकमध्येच या सिनेमाने 88 कोटी रुपयांची कमाई केली. तेलुगु आणि मल्ल्यालम व्हर्जनमध्येही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमाची स्टोरी मँगलोरच्या एका घटनेवर आधारित आहे. यामध्ये रवीयन्ना, भाव, करुणाकर गुरुजी आणि अशोक सारख्या पात्रांनी मोठी छाप टाकली आहे.
नक्की वाचा >> भारतात कसं होतं Adult Movies चं शूटिंग? पडद्यामागे काय काय घडतं? या अभिनेत्यानं केली पोलखोल, "रुम देतात आणि.."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world