जाहिरात

सिरियल किसरचा Netflix वर धमाका! टॉप ट्रेंडमध्ये आहे इमरान हाशमीचा 'हा' सिनेमा, सेलिब्रिटीही झाले अवाक

अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता इमरान हाशमी सध्या त्यांच्या ‘हक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. प्रेक्षकांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.

सिरियल किसरचा Netflix वर धमाका! टॉप ट्रेंडमध्ये आहे इमरान हाशमीचा 'हा' सिनेमा, सेलिब्रिटीही झाले अवाक
Netflix Top Trending Hindi Movies

Netflix Top Trend Movie : अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता इमरान हाशमी सध्या त्यांच्या ‘हक' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. प्रेक्षकांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री सारा अर्जुनने यामीच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. साराने इंस्टाग्राम स्टोरीज सेक्शनवर ‘हक'चित्रपटातील यामीच्या शाजिया बानो या पात्राचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टसोबत अभिनेत्रीने यामीचं कौतुक करत म्हटलं, "प्रिय यामी,मला खूप अभिमान वाटतो की आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारखे कलाकार आहेत.तुमची प्रामाणिकता आणि मेहनत स्क्रीनवर स्पष्ट दिसते,जी खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. तुम्ही नेहमीच एक उत्तम अभिनेत्री राहिल्या आहात.‘हक' चित्रपटाद्वारे तुम्ही पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय बनला आहात. लोकांनी तुमच्या अभिनयाची चमक पाहिली आहे. "चित्रपटात तुमचा अभिनय पाहून खूप अभिमान आणि आनंद वाटतो". इमरान हाशमी आणि यामी गौतम स्टारर 'हक' चित्रपट नेटफ्लिक्सवर सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. 

या चित्रपटात फक्त मनोरंजनच नाही, तर..

‘हक' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे,जो शाह बानो प्रकरणावर आधारित आहे. या चित्रपटात यामी गौतमने शाजिया बानोची भूमिका साकारली आहे, तर अभिनेता इमरान हाशमीने तिच्या पतीची भूमिका केली आहे.‘हक'ची कथा एका महिलेच्या संघर्षावर आणि तिच्या अधिकारांसाठीच्या लढाईवर आधारित आहे.यामीचे पात्र अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी आहे,ज्याने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर समाजात महिलांच्या अधिकारांबाबतही एक प्रभावी संदेश देतो.

नक्की वाचा >> भयंकर! ZP शिक्षक..उद्योजक अन् प्रसिद्ध किर्तनकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व एका क्षणात होरपळलं, 10 दिवसांपूर्वीच..

बॉक्स ऑफिसवर आपटला पण नेटफ्लिक्सवर गाजला

हा चित्रपट 7 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता,पण बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करू शकला नाही. काही दिवसांपूर्वी तो ओटीटीवर रिलीज झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांकडून या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लोक यामीच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत आणि इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही तिच्या अभनयाची प्रशंसा करत आहेत. यापूर्वी आलिया भट्ट,करण जोहर आणि सामंथा रुथ प्रभू यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे तिचे कौतुक केले आहे.

नक्की वाचा >> Tech News : मोबाईल वापरताना मध्येच येतोय Ads चा अडथळा? फक्त 'ही' सिक्रेट सेटिंग ऑन करा, टेन्शन कायमचं होईल दूर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com