जाहिरात

ऐश्वर्या रायने नाकारला मोठा सिनेमा, 75वं ऑडिशन देऊन त्या अभिनेत्रीचं नशीब चमकले, जिंकले 19 अवॉर्ड

Vidya Balan News: वर्ष 2005मध्ये एका सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे या सिनेमासाठी दिग्दर्शकाची पहिली निवड ऐश्वर्या राय होती, पण तिने सिनेमा नाकारला होता. पण या सिनेमामुळे नव्या अभिनेत्रीचे रातोरात नशीब बदलले.

ऐश्वर्या रायने नाकारला मोठा सिनेमा, 75वं ऑडिशन देऊन त्या अभिनेत्रीचं नशीब चमकले, जिंकले 19 अवॉर्ड
"Entertainment News: अभिनेत्री ऐश्वर्या रायने नाकारला होता मोठा सिनेमा"

Vidya Balan News: बॉक्सऑफिसवर 2005मध्ये रिलीज झालेल्या 8 कोटी रुपये बजेटच्या सिनेमाने बॉक्सऑफिस आणि प्रेक्षकांचे हदय अशा दोन्ही ठिकाणी स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले. हा ब्लॉकबस्टर सिनेमा होता 'परिणीता' (Parineeta), या सिनेमाने बॉक्सऑफिसवर तिप्पट कमाई केली आणि समीक्षकांची वाहवाई देखील मिळवली. परिणीता या रोमँटिक सिनेमाची कहाणी शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रसिद्धी बंगाली भाषिक कांदबरीवर आधारित आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रदीप सरकारने केले होते तर विधु विनोद चोप्रा निर्माते होते. पण तुम्हाला माहितीये का? सुपरहिट सिनेमासाठी अभिनेत्री म्हणून विद्या बालन ही पहिली पसंत नव्हती. 

निर्मात्यांची पहिली आवड ऐश्वर्या होती,पण...

सिनेमातील कलाकारांची निवड करणं हे पडद्यावरच्या जादूइतके सोपे नव्हते. सिनेमाची हीरोइन म्हणून निर्मात्यांनी ऐश्वर्या राय-बच्चनच्या नावास पसंती दर्शवली होती, पण हे गणित जुळून आले नाही. मोठ्या संख्येने कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या पण कोणाचीही निवड होऊ शकली नाही. अखेर 75व्या ऑडिशनमध्ये एका नवोदित अभिनेत्रीला पसंत करण्यात आले, ही अभिनेत्री होती विद्या बालन. या सिनेमामुळे रातोरात विद्या बालनचे नशीब उजळले.

"विद्या बालनचा आव्हानात्मक प्रवास"

संगीतकार शांतनु मोइत्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "विद्यासाठी हा प्रवास अतिशय आव्हानात्मक होता. कारण ताण इतका होता की प्रसिद्ध अभिनेत्रीही या भूमिकेसाठी ऑडिशन देत नव्हत्या. ब्रायन अ‍ॅडम्सच्या संगीत कार्यक्रमामध्ये विद्या बालन आली होती, तेथे तिला सिनेमाच्या ऑडिशनबाबत माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या ऑडिशनमुळे तिचे आयुष्यच पालटलं". 

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai: डोक्याला शॉट कुचकट सून तर चेटकीण-वेडी सासू, केदार शिंदेचा नवा सिनेमा येतोय भेटीला

(नक्की वाचा: Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai: डोक्याला शॉट कुचकट सून तर चेटकीण-वेडी सासू, केदार शिंदेचा नवा सिनेमा येतोय भेटीला)

परिणीता सिनेमाला मिळाले 19 पुरस्कार 

परिणीता सिनेमामध्ये विद्या बालनसह अभिनेता संजय दत्त आणि सैफ अली खान यांच्याही मुख्य भूमिका होत्या. जवळपास 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनेमाने तब्बल 24 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमासाठी विद्या बालनला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com