
Bharti Singh And Gola Video Viral: स्पर्धा, तिरस्कार, द्वेष, राग या सर्व गोष्टींदरम्यान मोठ्या माणसांना एकमेकांचं मन समजून घ्यायला, एकमेकांचे म्हणणं ऐकायला मुळीच वेळ नाही. बोलण्याबोलण्यामध्ये इतके गैरसमज होतात की पहिला गैरसमज सुटत नाही तोच दोन मिनिटांत 10 गैरसमज अधिक होतात आणि मूळ समस्या जैसे थेच... याचदरम्यान सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडीओ कॉमेडियन भारती सिंगचा मुलगा गोलाचा आहे. ज्या पद्धतीने गोला त्याच्या आईशी संवाद साधतोय, ते पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की अरे इतक्या लहान वयात कुठे आणि कसे आले इतके शहाणपण. इतक्या लहान वयामध्ये त्याच्यातील समजूतदारपणा मोठ्यांनाही लाजवणारा आहे. नेमके काय म्हणालाय गोला, जाणून घेऊया सविस्तर...
भारती सिंग दुसऱ्यांदा होणार आई | Bharti Singh Second Pregnancy News
काही दिवसांपूर्वी कॉमेडियन भारती सिंगने सोशल मीडियाद्वारे ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. भारती तिच्या जीवनातील ठराविक गोष्टी व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने गोलासोबत नवा व्लॉग (Bharati Singh New Vlog) शेअर केलाय. हा व्हिडीओ थेट मनाला स्पर्श करणारा आहे. मायलेकामधील संवाद कोणालाही भावुक करेल, असाच आहे. भारतीने तिचा तीन वर्षांचा मुलगा लक्ष्य म्हणजेच गोलाला विचारले की, "छोट्या बाळावर प्रेम करशील ना?" यावर गोलाने निरागसपणे उत्तर दिले, "हो, मी करणार, तो माझा मुलगा आहे." तीन वर्षांच्या मुलाचा इतका समजूतदार पाहून भारतीला रडूला आवरले नाही. आईला रडताना पाहून गोलाने तिला विचारलं की,"रडू येतंय, नको रडू" यादरम्यानच भारतीला त्याला पुन्हा विचारते की, "तू त्याची काळजी घेशील? जेव्हा आई शुटिंगला जाईल तेव्हा तू त्याच्याजवळ राहशील?" यावर गोला म्हणाला की, "हो मी राहीन". हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत.
गोल्याचे सोशल मीडियावर होतंय कौतुक | Bharti Singh Gola Emotional Video Viral
इतक्या लहान वयामध्ये गोला म्हणजे लक्ष्य लिंबाचिया ज्या पद्धतीने वागतोय किंवा बोलतोय, हे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक करत कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. renu06953 नावाच्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, "भारती ताई तुम्ही मुलाचे खूप चांगल्या पद्धतीने संगोपन केलंय. खूप चांगले संस्कार केले आहेत". thakur.janvi नावाच्या युजरने म्हटलंय की, "गोला हा समजूतदार मुलगा आहे आणि तो बेस्ट मोठा भाऊ होईल". तर pooja.keshari.165470 युजरने कमेंट केलीय की,"खरंच हा व्हिडीओ पाहून रडू येतंय."
(नक्की वाचा: Entertainment News: अप्सरेसारखी होती ही अभिनेत्री, ड्रायव्हरने 17 वेळा चाकूने केले सपासप वार; संपूर्ण देश हादरला)
एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे नाराज होऊन मोठ्या माणसांमधील संवाद हरवत चाललेला असताना लहान मुलं त्यांच्या छोट्या-छोट्या कृतीतून कधीकधी मोठी शिकवण देऊन जातात, गोलाचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ त्याचेच एक उदाहरण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world