Amol Kolhe News: छत्रपती संभाजी महाराजांनंतर अमोल कोल्हे साकारणार महात्मा फुलेंची भूमिका, मालिकेचे नाव काय?

Amol Kolhe News: अमोल कोल्हे तब्बल 17 वर्षानंतर स्टार प्रवाह चॅनेलवर दमदार कमबॅक करत आहेत. त्यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे?

जाहिरात
Read Time: 4 mins
"Amol Kolhe News: अमोल कोल्हे यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक"
Star Pravah Channel

Amol Kolhe News: स्टार प्रवाह वाहिनीवर नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने प्रामाणिक प्रयत्न केला. लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षक भेटीला घेऊन येणार आहे.  साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी महिलांना चूल आणि मूल या बंधनात बंदिस्त केलेल्या समाज व्यवस्थेविरोधात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी एल्गार पुकारला. या दोघांनी मिळून केलेल्या संघर्षामुळे मुलींना शिक्षणाच्या गंगोत्री खुली झाल्याने खऱ्या अर्थानं शिकून सज्ञान होता आले. अत्यंत बिकट परिस्थितीत, प्रसंगी घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष पत्करून त्यांनी काम केलं. अशा क्रांतिकारी दाम्पत्याचे त्या काळातील विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी ही मालिका प्रेक्षक भेटीला घेऊन येत आहेत. अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे जोतीबा फुले यांच्या भूमिकेत दिसतील. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. 

आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी : मधुराणी गोखले

मधुराणी गोखलेने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की, ‘सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.' 

Photo Credit: Star Pravah Channel

अमोल कोल्हे अभिनयाव्यतिरिक्त नव्या भूमिकेत

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाइफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अशा क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे. स्टार प्रवाहसोबतचं नातं खूप खास आहे. माझ्या आयुष्याला ज्या भूमिकेने कलाटणी दिली ती राजा शिवछत्रपती मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. जवळपास 17 वर्षांनंतर आता स्टार प्रवाहसोबत फक्त अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून देखील काम करणार आहे. मी या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंचा इतिहास मालिकेतून साकारणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे.' 

Photo Credit: Star Pravah Channel

सतीश राजवाडे काय म्हणाले?

या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘रसिकांच्या मनोरंजनासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य स्टार प्रवाह वाहिनी सातत्याने करत आली आहे. आजच्या जगात सर्वत्र स्त्री–पुरुष समानतेची वाटचाल सुरू आहे. देशातील महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया सक्षमपणे काम करताना दिसतात. परंतु काही काळापूर्वी त्यांची मर्यादा केवळ घर आणि मुलांपर्यंतच होती. ज्या समाजात मुलगी आठ वर्षांची झाली की तिला “वयात आली” असे म्हणत तिचे हसणे–खेळणे रोखले जाई, जिथे शिक्षण ही फक्त काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, अशा समाजात धैर्याने घराबाहेर पडून शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठी क्रांती घडवली. केवळ शिक्षणच नव्हे तर विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सतीप्रथा अशा अनेक अमानुष रूढींना ठामपणे विरोध करून संतुलित समाज उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला तो सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामुळे आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या ठाम पाठिंब्यामुळे. सावित्रीबाई संसार सांभाळून समाज परिवर्तनाची लढाई लढल्या. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री समाजात मानाने जगू शकते. अशा महान क्रांतिज्योतीची कथा मांडणं क्रमप्राप्त होतं. माझी खात्री आहे की ही मालिका समस्त मालिका विश्वात मैलाचा दगड ठरेल.'

Advertisement

(नक्की वाचा: Suraj Chavan Wedding Card Viral: सुरज चव्हाणची लग्नपत्रिका पाहिली का; साखरपुडा, हळद, विवाहसोहळा कधी आणि कुठे होणार? वाचा सर्व माहिती)

Advertisement

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेणारी नवी मालिका मी सावित्रीबाई जोतीराव फुले 5 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.