Suraj Chavan Wedding Card Viral: 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता सुरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरज त्याचे लग्न आणि नवीन घराच्या विषयामुळे चर्चेत आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरने तिच्या घरी सुरज चव्हाण आणि त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते, त्यावेळेस संजनाची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
सुरज चव्हाणचं लग्न कधी आहे? | Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan Marriage Date
यादरम्यान सुरजचं लग्न कधी आणि कुठे होणार आहे? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. साखरपुडा, हळदी समारंभ, लग्नसोहळा सर्व गोष्टी एकाच दिवशी होणार सुरजने सांगितलं होते. सुरज-संजनाच्या लग्नाच्या तारखेची माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नपत्रिकेची पोस्ट व्हायरल होत आहे. shatriya_ramoshi नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर सुरजच्या लग्नपत्रिकेचा फोटो पोस्ट करण्यात आलाय.
सुरज आणि संजनाचा शुभविवाह सोहळा कधी?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेवरील माहितीनुसार, साखरपुडा समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता, हळदी समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता आणि लग्नसमारंभ त्याच दिवशी संध्याकाळी 6.11 वाजता या शुभ मुहूर्तावर होणार आहे. पुण्यातील माऊली गार्डन हॉल येथे संजना आणि सुरजचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे.
गृहप्रवेश सोहळा | Suraj Chavan New Home Video
बिग बॉसमध्ये असताना सुरज चव्हाणने (Suraj Chavan New Home) अनेकदा त्याची हक्काच्या घराबाबतची इच्छा व्यक्त केली. यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि ते पूर्णही केले. सुरजच्या स्वप्नातील घराचं बांधकाम पूर्ण झालं असून त्याने कुटुंबीयांसोबत गृहप्रवेशही केलाय. आलिशान घराची झलक त्याने चाहत्यांना दाखवलीय.
(नक्की वाचा: Suraj Chavan Kelvan Video: सुरज चव्हाणचं केळवण! बिग बॉसचा व्हिनर प्रेमात माझ्या सायको.. बायकोचा भारी उखाणा ऐका)
सुरज चव्हाण आणि संजनाचा केळवण सोहळा | Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan Kelvan Video
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरने सुरज चव्हाण आणि त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळेस दोघांनी एकमेकांसाठी लय भारी उखाणे देखील घेतले. "बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण, सजनाचं नाव घेतो बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न" असा उखाणा सुरजने होणारी पत्नी संजनासाठी घेतला. तर "बिग बॉसचा व्हिनर झाला माझ्या प्रेमात सायको, सुरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको", असं जबरदस्त नाव संजनाने घेतला.
(नक्की वाचा: VIDEO : सूरज चव्हाणचं स्वप्नातलं घर सत्यात उतरलं; महालापेक्षा कमी नाही दुमजली बंगला!)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
