- त्रिशा कृष्णनची एकूण संपत्ती सुमारे 85 कोटी रुपये असून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे
- चेन्नईतील 10-12 कोटींचा आलिशान बंगला आणि हैदराबादमधील 6-7 कोटींची मालमत्ता
- त्रिशाचा कार कलेक्शनमध्ये महागड्या मर्सिडीज-बेंज, BMW आणि रेंज रोव्हर यांसह अनेक प्रीमियम गाड्यांचा समावेश
Trisha Krishnan Net Worth: त्रिशा कृष्णन गेल्या काही आठवड्यांपासून सतत चर्चेत आहे, विशेषतः अभिनेता सूर्यासोबतच्या 'करुप्पु' सिनेमातील तिची झलक समोर आल्यापासून सर्वत्र तिच्याच बातम्या आहेत. याशिवाय तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. थलापती विजय आणि त्रिशा यांच्यात खास मैत्री असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप दोघांनीही या नात्यावर किंवा मैत्रीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 4 मे रोजी जेव्हा तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांनी घवघवीत यश मिळवले, तेव्हा त्रिशा पुन्हा एकदा चर्चेत आली. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्रिशाचा वाढदिवसही होता आणि विजय यांच्या निवडणुकीतील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ती थेट त्यांच्या घरी पोहोचली होती. अफेअरच्या चर्चा तर सुरूच असतात, पण आज आपण या अभिनेत्रीच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.
त्रिशा कृष्णनचं नेट वर्थ
ETimes च्या रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णनची एकूण संपत्ती सुमारे 85 कोटी रुपये आहे. तिने आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्य अत्यंत विचारपूर्वक आणि मजबुतीने घडवले आहे. आयुष्य हटके पद्धतीने जगणे त्रिशाला पसंत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील विशेषतः तमिळ आणि तेलगू सिनेमांमधील ती एक आघाडीची अभिनेत्री असल्याने तिला मानधनही मोठे मिळते. विशेषतः 'पोन्नियिन सेल्वन'सिनेमाच्या यशानंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. GQ India नुसार, त्रिशाला थलापती विजयसोबतच्या 'लिओ' सिनेमातील भूमिकेसाठी सुमारे 5 कोटी रुपये देण्यात आले होते. याव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ती वर्षाला सुमारे 9 कोटी रुपये कमावते.
त्रिशा कृष्णनची मालमत्ता (Property)
मालमत्तेचा विचार केला तर त्रिशाचा चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत साधारण 10-12 कोटी रुपये आहे. असेही मानले जाते की, हैदराबादमध्येही तिची एक मालमत्ता आहे, ज्याची किंमत 6-7 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
(नक्की वाचा: Mukesh Khanna Getting Married: 'फक्त पतिव्रता का? पत्नीव्रता का नाही?' मुकेश खन्नांचे अफेअर, गर्लफ्रेंड, लग्नावर रोखठोक विधान)
त्रिशा कृष्णन तिच्या प्रीमियम कार कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ताफ्यात मर्सिडीज-बेंज S-Class, BMW 5 Series, Range Rover Evoque आणि मर्सिडीज-बेंज E-Class यासारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
त्रिशा कृष्णन सध्या काय करतेय?
त्रिशा कृष्णन शेवटची ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आणि सिलंबरसन TR यांच्यासोबत 'ठग लाइफ' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. मणी रत्नम दिग्दर्शित या गँगस्टर ॲक्शन ड्रामामध्ये ऐश्वर्या लक्ष्मी, अभिरामी, अशोक सेल्वन आणि महेश मांजरेकर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
आगामी काळात ती आरजे बालाजी दिग्दर्शित 'करुप्पु' या सिनेमात सूर्यासोबत झळकणार आहे. हा एक फँटसी ॲक्शन सिनेमा असून तो एका अशा जगावर आधारित आहे जिथे अन्याय आणि दुःख पाचवीला पुजले आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत एक रहस्यमयी माणूस नायक म्हणून समोर येतो. हा चित्रपट 14 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.