Dharmendra : 'प्रिय बाबा, स्वर्ग असो वा पृथ्वी...; धर्मेंद्रंच्या 90 व्या वाढदिवशी लाडक्या लेकीची भावनिक पोस्ट

धर्मेंद्र यांचा इशावर प्रचंड जीव होता. इशाच्या लग्नात पाठवणीवेळी धर्मेंद्र ढसाढसा रडत असल्याचा एक भावुक व्हिडिओदेखील समोर आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
बाबांसाठी इशाची खास पोस्ट

Dharmendra Birthday : सुपरस्टार धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी २४ नोव्हेंबरला जगाचा निरोप घेतला. आज ८ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यासाठी त्यांची लाडकी लेक इशा देओल हिने वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा एक भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच काही फोटोही शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. 

इशाने पोस्टमध्ये लिहिलंय, प्रिय बाबा...स्वर्ग असो वा पृथ्वी...आपल्यातील नातं इतकं अतूट आहे. आपल्याला कुणीच वेगळं करू शकत नाही. आपण नेहमी एकत्र आहोत. सध्या मी तुम्हाला खूप प्रेमाने, काळजीपूर्वक माझ्या हृदयात खोलवर जपून ठेवलंय. आयुष्यभर माझ्यासोबत राहण्यासाठी... तुम्ही दिलेली शिकवण, मार्गदर्शन, उबदारपणा, नि:शर्त प्रेम, जीवनाचे धडे, तुमची मुलगी म्हणून मला मिळालेली प्रतिष्ठा आणि शक्ती इतर कोणत्याही गोष्टीने बदलली जाऊ शकत नाही किंवा त्यांची तुलना केली जाऊ शकत नाही.

नक्की वाचा - Dharmendra : ना बॉबी ना सनी, दोघांनीही केलं नाही वडिलांच्या अस्थिचं विसर्जन; मोठं कारण आलं समोर

इशा पुढे लिहिते, मला तुमची खूप आठवण येते बाबा...तुमचं हास्य, तुमची शायरी... तुमचे मऊ पण मजबूत हात...तुमची उबदार मिठी खूप आठवते. तुम्ही  म्हणायचा, "नेहमी नम्र रहा, आनंदी, निरोगी आणि मजबूत रहा". तुम्ही दिलेली शिकवण मी पुढे तसंच ठेवेन याचं तुम्हाला वचन देते. 
 

Advertisement

मी तुमचं प्रेम लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे माझ्याइतकेच तुमच्यावर प्रेम करतात. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा. तुमची गोड मुलगी, तुमची ईशा, तुमची बिट्टू.

Advertisement