Dharmendra's Asthi Visarjan : बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर धर्मेंद्र यांच्या अस्थी बुधवारी हरिद्वारमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यांच्या कुटुंबातील पुरोहितांनी याबाबत माहिती दिली. पुरोहितांनी सांगितलं, अस्थी विसर्जनापासून मीडिया आणि सर्वसामान्यांना पूर्णपणे लांब ठेवण्यात आलं होतं.
देओल कुटुंबाचे पुरोहित पंडित संदीप पाराशर श्रोत्रीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरकी पौडी येथे धर्मेंद्र यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात आलं. सोशल मीडियावर अस्थी विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सनी देओल कॅमेरा हातात असलेल्या व्यक्तीवर चिडत असल्याचं दिसत आहे.
सनी देओलला करायचं होतं धर्मेंद्र यांच्या अस्थिंचं विसर्जन पण...
पुरोहितांनी सांगितलं, अस्थी विसर्जनापूर्वीच्या सर्व विधी खासगी हॉटेलमध्येच पूर्ण करण्यात आल्या होत्या. क्षोत्रीय यांनी सांगितलं की, यानंतर सनी देओलचा मुलगा करण देओल आणि कुटुंबीय दुचाकीवरुन हरकी पौडीला पोहोचले. येथे धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन करण्यात आलं. पुरोहितांनी सांगितल, अस्थी विसर्जनासंबंधित विधी सनी देओल यांना करायचा होता. मात्र सनी देओल यांनी हा विधी केला असता तर मोठी गर्दी जमा होण्याची शक्यता होती. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाचा विधी सनी देओल याचा चिरंजीव आणि धर्मेंद्र यांचा नातू करण याने पूर्ण केले.
The family of veteran actor Dharmendra immersed his ashes in Ganga at Har Ki Pauri in Haridwar, the family's priest said.
— News Arena India (@NewsArenaIndia) December 3, 2025
Priest said Dharmendra's grandson and Sunny Deol's son Karan Deol reached Har Ki Pauri with family members on a two-wheeler and performed rituals. pic.twitter.com/Z2VZxP93Ml
हेमा मालिनी आणि इशा देओल नव्हते उपस्थित...
पुरोहितांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल कुटुंबासह मंगळवारी हरिद्वारला पोहोचले. याच दिवशी अस्थी विसर्जन करायचं ठरलं होतं. मात्र कुटुंबातील एक व्यक्ती वेळेत न पोहोचल्याने हा विधी दुसऱ्या दिवशी करण्याचं ठरलं. पुरोहितांनी सांगितलं की, अस्थी विसर्जनाच्या विधीवेळी धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी किंवा त्यांच्याकडून कोणीही उपस्थित नव्हतं.
नक्की वाचा - Dharmendra News : बॉबी देओलला 'ती' आवडायची अन् तिला धर्मेंद्र! देओल कुटुंबातील ट्रायअँगल; कोण आहे अभिनेत्री?
सनी देओल पुन्हा संतापला...
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सनी देओल कॅमेरा हातात असलेल्या एका व्यक्तीवर चिडताना दिसत आहे. ही व्यक्ती त्यांचे व्हिडिओ शूट करीत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर अभिनेत्याला अनेक चाहत्यांनी समर्थन दिलं. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं. सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न केल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
