ओटीटीचा जमाना सुरू झाल्यापासून बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या प्रमुख कलाकारांनी ओटीटीकडे आपला मोर्चा वळवला. ओटीटीने अनेक कलाकारांना आपली हरवलेली प्रसिद्धी परत मिळवून देण्यास मदत केली आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार सर्वसाधारणपणे मालिका करत नाही मात्र ओटीटीमुळे हा कल काहीसा बदललेला दिसतो.
हल्ली बॉलीवूडचे आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री ओटीटी मालिकांमध्ये काम करताना दिसतात. हा प्रयोग ओटीटीची संकल्पना उदयास येण्याच्या बरीच वर्ष आधी म्हणजे, 1980 च्या दशकात करण्याचा प्रयत्न झाला होता.
ही योजना बनवली होती दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी. रमेश सिप्पी हे शोले, सीता और गीता, शान, शक्ती, सागर या सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर होते.
मुख्य अभिनेत्री पळून गेली
हमलोग मालिका बरीच प्रसिद्ध झाली होती. या प्रसिद्धीमुळे दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी रमेश सिप्पी यांच्याशी संपर्क साधत आणखी एक मालिका तयार करण्यास त्यांना गळ घातली होती. पेशाने पत्रकार असलेल्या मनोहर श्याम जोशी यांनी लिहिलेल्या एका कथेची मालिकेसाठी निवड करण्यात आली.
त्यांनी फाळणीनंतर मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात घडणाऱ्या घटनांवर आधारीत काल्पनिक कथा लिहिली होती. ही कथा आवडल्याने त्यावर काम सुरू झाले.
1985 मध्ये रमेश सिप्पी यांचा सागर चित्रपट प्रसिद्ध झाला होता. कमल हासन यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. कमल यांचे नाव इथे घेण्यामागचे कारण वाचकांना पुढे कळेल. रमेश सिप्पी यांनी हाती घेतलेल्या नव्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेते कंवलजीत यांनी सांगितले की बुनियादपूर्वी ते छपते-छंपते या मालिकेत काम करत होते. या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका अभिनेत्री सारिका हिला देण्याचं निश्चित झालं होतं. मात्र सारिका अचानक मद्रासला पळून गेली असं कंवलजीत यांनी सांगितले. सारिका यांचे कमल हासन यांच्या 1988 साली लग्न झाले. या दोघांना दोन मुली असून श्रृती आणि अक्षरा हासन या त्यांच्या मुली अभिनेत्री आहेत.
प्लॅन फसला पण मालिका हिट झाली
मात्र तारखा जमतील की नाही, वेळेवर चित्रीकरण पूर्ण होईल की नाही या चिंतेमुळे रमेश सिप्पी यांनी दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना मालिकेत न घेता इतर कलाकारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या मालिकेमध्ये एकाहून एक असे सरस कलाकार होते. उदाहरण द्यायचे झाल्यास, किरण जुनेजा, विजयेंद्र घाटगे, गोगा कपूर, नीना गुप्ता, सोनी राझदान, कृतिका देसाई, अंजना मुमताज, राजेश पुरी, पल्लवी जोशी, दिलीप ताहील,सुधीर पांडे यांचे देता येईल. या मालिकेत काम करणारे अभिनेते कंवलजीत यांनी सांगितलं की ही मालिका जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांच्या घरी टीव्ही नव्हता.
मालिका करत असताना ही मालिका आणि त्याच्यासोबत आपणही प्रसिद्ध होऊ याची मला बिलकुल कल्पना नव्हती असे कंवलजीत यांनी म्हटले. मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर ओळखणाऱ्यांची संख्या वाढली ज्यावरून कंवलजीत यांना प्रसिद्धीचा अंदाज यायला लागला. टीव्ही हे माध्यम चित्रपटापेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचणारे माध्यम असल्याने ही प्रसिद्धी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मालिकेमुळे रचली गेली वैवाहीक आयुष्याची 'बुनियाद'
छंपते-छंपते मालिकेमध्ये मुख्य भूमिका असलेली सारिका मद्रासला पळून गेल्याने निर्मात्यांसमोर प्रश्न उभा राहिला होता की तिच्याजागी कोणाला घ्यायचे. कंवलजीत यांनी अनुराधा पटेल यांचे नाव निर्मात्यांना सुचवले होते. अनुराधा पटेल यांचा अभिनय पाहिल्यानंतर त्यांची मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. इथून कंवलजीत आणि अनुराधा यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. छंपते-छंपते मालिकेमुळे कंवलजीत आणि अनुराधा अधिक जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.