
पाँडिचेरीची प्रसिद्ध मॉडेल सैन रेचलने आत्महत्या (Famous model San Rachel from Pondicherry) केल्याचं समोर आलं आहे. कर्जाचा बोजा आणि तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सैन हिचं गेल्याच वर्षी लग्न झालं होतं. दरम्यान तपासाचा जोर वाढवला आहे.
घटनास्थळावरुन एक सुसाइड (San Rachel Suicide) नोटही सापडली आहे. यामध्ये रेचलने लिहिलंय, या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही. पैशांसाठी तिने आपले दागिने कर्जाऊ दिल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक बोजाचं कारण आहे की नाही याचाही तपास केला जात आहे.
प्रतिभेच्या जोरावर सैन रेचल उर्फ शंकर प्रिया हिने मॉडेलिंगच्या जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ती पाँडिचेरीच्या करमनी कुप्पममध्ये राहत होती. किडनीच्या समस्येमुळे गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान तिने राहत्या घरात ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्या केली.
नक्की वाचा - TV Actress: मिरचीचा स्प्रे, नंतर चाकूहल्ला... 'त्या' संशयातून अभिनेत्रीवर पतीचा हल्ला
अनेक फॅशन शो आयोजित करताना झालेल्या नुकसानीमुळे तिने आत्महत्या केली असावी. पाँडिचेरी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. 2020-2021 मध्ये मिस पॉंडिचेरी, 2019 मध्ये मिस डार्क क्वीन तमिळनाडू आणि त्याच वर्षी मिस बेस्ट अॅटिट्यूडसह अनेक किताब जिंकणाऱ्या रेचलने ब्लॅक ब्युटी श्रेणीमध्ये मिस वर्ल्डचा किताबही जिंकला आहे.
हेल्पलाइन
वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ - ९९९९६६६५५५ किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall - ०२२-२५५२११११ (सोमवार ते शनिवार - सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत उपलब्ध)
(जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीला माहिती हवी असेल तर कृपया तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी संपर्क साधा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world