अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान निर्मातीची Instagram पोस्ट, PHOTO व्हायरल

चित्रपट निर्माती अनु रंजन हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि तिची आई वृंदा राय त्यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे दाम्पत्य मागील काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. मात्र दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेकवेळा दोघांना वेगळे पाहिले गेले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान, दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसत आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते खूश झाले आहेत. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे, असं चाहते म्हणत आहेत.   

(नक्की वाचा- अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही)

चित्रपट निर्माती अनु रंजन हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि तिची आई वृंदा राय त्यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत. दोघांच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर दोघेही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यात विभक्त झाल्याच्या चर्चा आहेत. एका हाय प्रोफाईल लग्नात देखील दोघे वेगळे दिसले होते. दोघांनी लग्नाला वेगळी हजेरी लावली होती. अलीकडेच, ऐश्वर्याने तिच्या नावातून बच्चन आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला होता. 

Advertisement

(नक्की वाचा:अभिषेक बच्चनपूर्वी जोडीदार म्हणून हा व्यक्ती निवडण्याची ऐश्वर्याची होती इच्छा, नाव ऐकून बसेल धक्का)

अभिनेत्री ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. यानंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे त्यांचे चाहते चिंतीत असून लवकरच दोघाचं नातं सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत.