जाहिरात

Ram Gopal Verma: चित्रपट निर्माता रामगोपाल वर्माला जेलमध्ये जावं लागणार, कारण काय?

हे प्रकरण 2018 सालातील आहे. श्री नावाच्या कंपनीने ही केस केली होती. या कंपनीतील महेशचंद्र मिश्रा यांनी वर्मा यांच्या विरोधात तक्रार केली होती.

Ram Gopal Verma: चित्रपट निर्माता रामगोपाल वर्माला जेलमध्ये जावं लागणार, कारण काय?
मुंबई:

चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट ही जारी करण्यात आलं आहे. सात वर्ष जुन्या चेक बाऊंस प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना अंधेरी कोर्टाने या प्रकरणात 3 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. शिवाय जर पुढील तीन महिन्यात तक्रारदाराचे पैसे दिले नाहीत तर आणखी तीन महिने त्यांना जेलमध्येच रहावे लागणार असल्याचं या निकालात म्हटलं आहे. राम गोपाल वर्मा यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

राम गोपाल वर्मा यांनी सात वर्षा पुर्वी एक चेक दिला होता. पण तो चेक बाऊंस झाला. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. ज्या कलमा अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार जर चेक बाऊंस झाला तर त्या गुन्ह्यात त्यांना जेल होवू शकते. या प्रकरणात राम गोपाल वर्मा हे दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांनी तीन महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिवाय तीन महिन्याच्या आता त्यांना तक्रारदाराचे 3.72 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहे. जर त्यांनी ही रक्कम दिली नाही तर त्यांना आणखी तीन महिने कारावास सोसावा लागेल. 

ट्रेंडिंग बातमी - Sharad Pawar News: आधी एका मंचावर आले नंतर बंद दाराआड चर्चा, पवार काका-पुतण्याचं चाललंय काय?

हे प्रकरण 2018  सालातील आहे. श्री नावाच्या कंपनीने ही केस केली होती. या कंपनीतील महेशचंद्र मिश्रा यांनी वर्मा यांच्या विरोधात तक्रार केली होती. सत्या, रंगीला, सरकार सारख्या सुपर हिट चित्रपटांची निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली होती. पण काही काळानंतर त्यांची आर्थिक स्थिती खालावली. कोविड काळात तर त्यांची स्थिती आणखी वाईट झाली. त्यांना आपलं कार्यालयही विकावं लागलं होतं. दरम्यान या प्रकरणी वर्मा यांना 2022 मध्ये जामीन दिला गेला होता. 

ट्रेंडिंग बातमी - SIP calculator: रोज 100 रुपये गुंतवा अन् करोडपती बना, विश्वास होत नाही तर ही बातमी नक्की वाचा

 या निकालानंतर रामगोपाल वर्मा यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले अंधेरी कोर्टाचा निकाल आला आहे. हे प्रकरण 7 वर्षा पुर्वीचे आहे. या प्रकरणात 2 लाख 38 हजाराचा प्रश्न निर्माण झाला होता. हे प्रकरण कंपनीतील माजी कर्मचाऱ्याबाबत आहे. हे प्रकरण पैशासंदर्भात नाही. तर हेराफेरी करण्या संदर्भात आहे. याबाबत आपण अधिक काही बोलणार नाही असंही वर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com