V Shantaram : भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे व्ही. शांताराम यांची जीवनगाथा आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे व्ही. शांताराम यांचं कार्य आताच्या पिढीला पाहण्याची संधी मिळेल. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.
संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वास
‘झनक झनक पायल बाजे'च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ'च्या सामाजिक विचारांपर्यंत, ‘अमृतमंथन'च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक'च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे. जे व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक असणार आहे.
सिद्धार्थ चतुर्वेदी याने आतापर्यंत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. वेब सीरिज इनसाइड एज आणि चित्रपट गली बॉयमध्ये त्याने काम केलंय. त्याचा जन्म २९ एप्रिल १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात झाला आणि त्यानंतर २०१६-१७ मध्ये एक टीव्ही मालिका लाइफ सही है मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
नक्की वाचा - Dharmendra : BJP जॉइन केल्यानंतर धर्मेंद्र यांना मुस्लीम महिलेचा कॉल; अस्सं उत्तर दिलं की Video होतोय व्हा
व्ही. शांताराम कोण होते?
मूक चित्रपटापासून ते ध्वनी आणि नंतर रंगीत चित्रपटांपर्यंत, त्यांनी प्रत्येक पावलावर भारतीय चित्रपटसृष्टीला पुढे नेलं. त्यांच्या चित्रपटाने मनोरंजन, समाजातील सत्य आणि बदल घडवला. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला बंडखोर म्हणूनही ओळखले जाते.
चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित...
‘व्ही. शांताराम' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर या पोस्टरने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक गेम चेंजर ठरणार आहे. ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले असून भव्य दृश्यरचना आणि कलात्मक दृष्टीने त्यांनी या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेले आहे.