Actress Chhaya Kadam: अभिनेत्री छाया कदम यांना वनविभागाची नोटीस, मुलाखतीतील एक वक्तव्य भोवलं

छाया कदम यांच्यावर संरक्षित वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याबाबत दावा केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Actress Chhaya Kadam : 'सैराट', अभिनेत्री छाया कदम आता मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य छाया कदम यांच्या चांगलंय अंगलट आल्याचं दिसून येत आहे. कारण वन विभागाने छाया कदम यांना नोटीस बजावत चौकसीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छाया कदम यांच्यावर संरक्षित वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याबाबत दावा केला होता. छाया कदम यांनी एका मुलाखतीत बोलताना, हरिण, रानडुक्कर, घोरपड, सालिंदर या संरक्षित वन्यजीवाचे मांस खाल्ल्याचे सांगितले होते. सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक पश्चिम वन्य विभाग बोरिवली मुंबई यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.

(नक्की वाचा-  Bihar News: तब्बल 2000 सापांना जीवदान दिले, त्याचाच सर्पदंशाने जीव गेला; हृदयद्रावक घटना)

यानंतर छाया कदम  यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमचे 1972 चा भंग केल्याचा ठपका ठेवत वन खात्याने नोटीस बजावली आहे. वन विभागाच्या नोटीसनुसार, त्यांना 5  मे रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे सदर नोटीस मध्ये सांगण्यात आले. 

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

छाया कदम यांनी कोणत्या जंगलातील कोणतं मांस  खाल्लं? त्यांना ते कुणी पुरवलं? या सगळ्याचा शोध घेण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.  छाया कदम यांच्या या वक्तव्यामुळे अनेक वन्यप्रेमी यांनी छाया कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा पद्धतीची मागणी लावून धरलेली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article