
बिहार: बिहारच्या समस्तीपूर हरपूर भिंडी प्रभाग क्रमांक 3, ताजपूर, समस्तीपूर येथील जयकुमार साहनी यांचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. जय कुमार साहनी गेल्या पाच वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत लोकांचे प्राण वाचवण्याच्या मोहिमेत गुंतले होते. संपूर्ण जिल्ह्यात त्यांना 'सापांचा मसीहा' म्हटले जात होते. मात्र सापांना जिवदान देणाऱ्या या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सापांचा मसीहा म्हणून प्रसिद्ध असलेले जय कुमार साहनी गेल्या 5 वर्षांपासून सापांना वाचवत होते. जय कुमार साहनी यांनी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक सापांना वाचवले आहे. जय कुमार साहनी सापांना वाचवून जंगलात सोडत असत. जय कुमारला लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. हेच कारण होते की तो प्राण्यांना वाचवण्यात नेहमीच आघाडीवर असायचा. जय कुमार साहनी यांनी सापांना वाचवतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
गुरुवारी त्याला जवळच्या गावातून फोन आला जिथे एक विषारी साप दिसला. जयने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. यावेळी सापाने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. घटनेनंतर लगेचच त्याची तब्येत बिघडू लागली. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
तेथून त्याला सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. सदर रुग्णालयात तैनात असलेले डॉ. संतोष कुमार म्हणाले की, जय कुमार साहनी यांना सदर रुग्णालयात आणले तेव्हा खूप उशीर झाला होता. विष त्याच्या शरीरात पसरले होते आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. जय साहनीचे लग्न सुमारे 13 वर्षांपूर्वी झाले होते. त्याला दोन लहान मुले आहेत. जयचे वडील शिवलंगन साहनी म्हणाले की, जयला लहानपणापासूनच प्राण्यांवर प्रेम होते आणि त्याने हे काम कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय शिकले. तो सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात तासनतास घालवत असे. सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world