
एक पोलिस हवालदार. जो सकाळी खादीमध्ये वावरायचा. पण रात्र झाल्यानंतर त्यांचे रोल बदलायचा. तो एका वेगळ्याच जगात वावरायचा. हे जग होते गुन्हागारीचे. तेही अशा गुन्हेगारीचे ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडाले होते. रात्री हा पोलिस हवालदार एकट्या महिलांना हेरायचा. जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसायचा. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायाचा. तो ऐवढ्यावर थांबायचा नाही तर त्यांना ठार करायचा. ही सत्य घटना आता तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहाता येणार आहे. 'इंडियन प्रीडेटर: बीस्ट ऑफ बैंगलोर' या नेटफ्लिक्स क्राइम डॉक्यू-सीरीजच्या माध्यमातून तुम्ही हा अंगावर काटा आणणार थरार अनुभवू शकता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही सीरीज एका माजी पोलीस कॉन्स्टेबलवर आधारीत आहे. ही एक सत्या कथा आहे. उमेश रेड्डी असं त्या हवालदाराचं नाव आहे. त्याने जवळपास 18 महिलांवर बलात्कार केले होते. त्यानंतर त्याने त्यांची हत्या केली होती. ही एक भयानक सत्यकथा आहे. पोलिसांवर तसा आपण विश्वास ठेवतो. पण ही कथा पाहिल्यानंतर तुमचा पोलिसांवरील विश्वास उडून जाईल. एक पोलिस कर्मचारी खाकीच्या आडून क्रूर गुन्हे करत होता. त्याचा मागमूसही कुणाला तो लागू देत नव्हता. तो अत्यंत क्रुर पद्धतीने या सर्व गोष्टी करत होता. त्याच्यावर कुणी संशयही घेत नव्हते. त्यामुळे त्याने एक नाही तर तब्बल 18 बलात्कार आणि 18 खून केले.
तो एक सिरीअल रेपीस्ट आणि किलर बनला होता. ही सीरीज उमेश रेड्डी नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलची सत्या कहाणी आहे. तो दिवसा खाकी वर्दीत असायचा. रात्री एक सीरियल रेपिस्ट आणि खुनी बनून एकट्या महिलांना लक्ष्य करायचा. तो त्यांच्या घरात घुसायचा, बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. हे त्याचा तसा दिनक्रमच बनला होता. त्याची त्याला सवय लागली होती.त्यामुळे तो अनेक महिलांना शोधायचा आणि आपली शिकार करायचा.
पण एक दिवस उमेश रेड्डी पकडला गेला. तो कसा पकडला गेला ते या वेब सिरीजमध्ये तुम्हाला पाहाता येणार आहे. 18 महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचं त्याने कबूल केलं होतं. त्यापैकी नऊ प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं. 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नंतर ती जन्मठेपेमध्ये बदलण्यात आली. उमेश रेड्डीच्या क्रूर गुन्ह्यांना थरारक पद्धतीने यात सादर करण्यात आलं आहे.पोलीस, पत्रकार आणि या प्रकरणाशी संबंधित इतर लोकांच्या खऱ्या मुलाखती यात आहेत. काही दृश्यांमध्ये गुन्हेगार ठिकाणांचं पुनर्रचना (reconstruction) आणि कोर्ट केसचे तपशील देखील दाखवले आहेत. ते तुम्हाला अक्षरशः हादरवून सोडतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world