Gautami Patil: "ओंकाररावांचं नाव घेते..."; गौतमी-ओंकारचं जमलं? काय आहे गच्ची कनेक्शन?

Gautami Patil-Omkar Raut : गौतमी पाटील आणि ओंकार राऊत यांचा लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हे लग्न नसून त्यांच्या आगामी 'गच्चीवरून कशी दिसते' या गाण्याच्या रिमेकचे शूटिंग आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसिद्ध डान्सर आणि 'हास्य जत्रा फेम' ओंकार राऊत यांची जोडी पहिल्यांदाच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र आली आहे. गौतमीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि ओंकार नववधू-वराच्या वेशात दिसत असून गौतमी चक्क उखाणा घेताना दिसत आहे.

"ओंकार रावांचं नाव घेते..."

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील गृहप्रवेश करताना दिसते आहे. यावेळी आजूबाजूचे लोक तिला नाव घ्यायला सांगतात, तेव्हा गौतमी अत्यंत खास अंदाजात उखाणा घेते. "ना वायफाय ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट... ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट!" हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला अनेकांना ओंकार आणि गौतमीने खरोखर लग्न केले की काय, असा प्रश्न पडला होता.

Advertisement

पाहा VIDEO

'गच्चीवरून कशी दिसते' गाण्याचा रिमेक

चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर खुद्द गौतमीनेच दिलं आहे. हा व्हिडिओ त्यांच्या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगचा एक भाग आहे. 2017 मध्ये गाजलेलं 'गच्चीवरून कशी दिसते' हे लोकप्रिय गाणं आता रिमेक स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच गाण्यात ओंकार आणि गौतमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

गौतमीने हा व्हिडिओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी "हे कधी झालं?" अशा कमेंट्स केल्या, तर काहींनी या नव्या जोडीला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांचा गोंधळ उडू नये म्हणून गौतमीने "शुटिंग आहे" अशी स्पष्ट कमेंट करत अफवांना पूर्णविराम दिला आहे. ओंकार राऊत-गौतमी पाटीलला एका वेगळ्या रोमँटिक भूमिकेत पाहून चाहतेही खूश झाले आहेत.

पाहा VIDEO


Topics mentioned in this article