Girija Oak : सईसोबत इंटीमेट सीन करणाऱ्या गुलशनसोबत गिरिजा ओकचा कसा होता अनुभव? बोल्ड सीनबाबत पहिल्यांदाच बोलली

गिरिजा ओक गोडबोले हिने आगामी वेब सीरिजमध्ये गुलशन देवैयासोबत एक इंटीमेट सीन शूट केला आहे. त्यादरम्यानचा अनुभव तिने एका मुलाखतीदरम्यान शेअर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Girija Oak and Gulshan Devaiah : मराठी अभिनेत्री गिरिजा ओक हिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर गिरिजा ओक एक्सवर ट्रेंड होत आहे. यानिमित्ताने अनेकांनी गिरिजा ओकचा अमीर खानसोबतच 'तारे जमीन पर' मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान लवकरच गिरिजा ओक आगामी वेब सीरिज थेरेपी शेरेपीमध्ये गुलशन देवैयासोबत दिसणार आहे. गुलशन देवैया 'हंटर'मध्ये सई ताम्हणकरसोबत दिसला होता. या चित्रपटात त्याने सईसोबत अनेक इंटीमेट सीन केले होते. गिरीजा ओकसोबत आगामी चित्रपटाही गुलशन आणि गिरीजामध्ये इंटीमेट सीन आहेत. याबाबत गिरीजा ओक पहिल्यांदाच एका मुलाखतीत व्यक्त झाली आहे. 

गुलशन देवैयाचं केलं कौतुक...

इंटीमेट सीन करणं अनेकदा कठीण वाटतं. मात्र गुलशनसोबत इंटीमेट सीन करताना अजिताब संकोच वाटला नाही. कारण तो समोरील व्यक्तीच्या भावनांचा विचार करतो. समोरच्याची काळजी घेतो. त्यामुळे काही असे लोक असतात ज्यासोबत अजिबात अस्वस्थ वाटत नाही. गुलशन त्यापैकी एक आहे. आमच्या दोघांमध्ये इंटीमेट सीन शूट होणार होता. त्याआधी गुलशनने व्हॅनिटी व्हॅनमधील तीन विविध प्रकारशा उशा आणल्या. एक लहान, एक मोठी, एक मऊ उशी तर एक उशी अत्यंत कडक होती. त्याने या उशा माझ्यासमोर ठेवल्या आणि त्यापैकी एक उशी निवडायला सांगितली. इंटीमेट सीनदरम्यान किमान १६ ते १७ वेळा तो मला एकच प्रश्न सतत विचारत होता. तू ठीक आहेस ना?

नक्की वाचा - Chilgam Song : मलायका अरोराचा डान्स पाहून लोक भडकले; हनी सिंहचं 'चिलगम' गाणं वादाच्या भोवऱ्यात, Video

गिरीजा आणि गुलशनमध्ये बेडवरील एक इंटीमेट सीन शूट होत होता. यावेळी गिरीजा बेडवर आणि तिच्यावर गुलशन होता. गिरीजाने पायांमध्ये उशी घेतली होती. मात्र काही केल्या सीन नीट शूट होत नव्हता. त्यादरम्यान तू ठीक आहेस ना, असं गुलशन वारंवार विचारत होता. शेवटी मीच त्याला ती उशी काढली तर चालेल का असा प्रश्न केला. यावर गुलशनने तुला जसं कन्फर्टेबल असेल असं प्रत्युत्तर दिल्याचं गिरिजाने सांगितलं. गुलशनने अशा अवघड सीनवेळी अत्यंत कन्फर्टेबल केल्याचा किस्सा गिरिजाने 'लंलन टॉप'च्या मुलाखतीत सांगितला आहे. 

Advertisement

'थेरपी शेर्पी' नवी वेब सीरिज

गुलशन देवैया आणि गिरिजा ओक गोडबोले अभिनीत 'थेरपी शेर्पी' ही एक आगामी वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. जटिल मानवी भावना आणि नातेसंबंधांचा शोध घेणाऱ्या या सीरिजची रिलीज तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.