५२ वर्षांची मलायका अरोरा ( MALAIKA ARORA) ही रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग (YO YO HONEY SINGH) याच्या 'चिलगम' (CHILLGUM song viral) (चिलगम म्हणजे च्युंगम) या गाण्यात डान्स करताना दिसत आहे. नुकतच हे गाणं रिलिज झालं आहे. गाणं रिलिज होताच व्हायरल झालं. मात्र या गाण्यातील डान्स स्टेप्समुळे मलायका युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. मलायकाने या गाण्यात अश्लील डान्स केल्याचा आरोप युजर्सकडून केला जात आहे. चिलगम हे गाणं यो यो हनी सिंग याच्या आगामी म्युझिक अल्बम ५१ ग्लोरियस डेजमधील भाग आहे. गाण्याचा टिजर ७ नोव्हेंबरला आणि गाणं ८ नोव्हेंबरला रिलिज झालं आहे.
या गाणयात मलायक अरोरा ही हनी सिंगसोबत डान्स करताना आणि बोल्ड डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मात्र युजर्सना ही केमिस्ट्री फारशी भावली नसल्याचं दिसत आहे. त्यांनी गाण्याचा कोरिओग्राफर आणि मलायका अरोरा हिच्यावर टीका केली आहे.
नक्की वाचा - Samantha Prabhu : समंथा पुन्हा पडली प्रेमात? घटस्फोटीत दिग्दर्शकापेक्षा किती वर्षांनी लहान? नेटवर्थ जाणून घ्या
जीभ काढून डान्स स्टेप, युजर्स संतापले
चिलगम म्युझिक व्हिडिओचा एक बीटीएस फोटो रेडिटवर व्हायरल झाली. या फोटोमध्ये मलायला अश्ली हावभाव करताना दिसत आहे. ही पोज मजामस्तीमध्ये करण्यात आली असली तरी सोशल मीडियावर यावर संताप व्यक्त केला जात आहे. मलायकाचा डान्स पाहून युजर्स हैराण झाले आहेत. अभिनेत्री अशा प्रकारचा डान्स करू शकते, यावर अनेकांना विश्वास बसत नसल्याचं दिसत आहे.
मलायकासाठी एका युजरने लिहिलंय, मलायका निक्की मिनाज सारखी का वागतेय? दुसऱ्या एका युजरने लिहिलं, मलायका असा डान्स का करतेय? वयाच मुद्दा नाहीये मात्र यात ती चीप आणि वल्गर दिसतेय.
हनी सिंग किंवा मलायका अरोरा या दोघांनीही या गाण्यातील टीकेला उत्तर दिलेले नाही. मलायका अरोरा यापूर्वी छैया छैया, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली आणि माही वे या गाण्यांमध्ये दिसली आहे, जिथे तिला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
