जाहिरात

Scam च्या निर्मात्यांचा Lucky Baskhar च्या निर्मात्यावर गंभीर आरोप

वासमी यांनी हे विधान दिग्दर्शक बोनी कपूर यांना खिजवण्यासाठी केल्याचे बोलले जात आहे. या गोलमेज चर्चेला बोनी कपूर हे देखील उपस्थित होते.

Scam च्या निर्मात्यांचा Lucky Baskhar च्या निर्मात्यावर गंभीर आरोप
मुंबई:

अभिनेता दुलकर सलमान याची प्रमुख भूमिका असलेला 'Lucky Baskhar' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या चित्रपटावरून नवा वादंग निर्माण होऊ लागला आहे. या चित्रपटाचे निर्माते नागा वासमी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रसिद्ध निर्माते हंसल मेहता यांची स्कॅम ही वेबसिरीज प्रचंड गाजली होती. हर्षद मेहता आणि शेअर घोटाळा यावर ही सिरीज आधारीत होती. या वेबसिरीजमधून बराचसा भाग बिनदिक्कतपणे चोरण्यात आल्याचा आरोप हंसल मेहता यांनी केला आहे. वामसी हे अत्यंत उद्धट असल्याची टीकाही हंसल मेहता यांनी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एका गोलमेज चर्चेमध्ये बोलताना वासमी यांनी बॉलीवूडचे निर्माते-दिग्दर्शक हे मुंबईतील पॉश एरिया डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवत असतात असे म्हटले होते. हे निर्माते-दिग्दर्शक वांद्रे, जुहूसारखे भाग डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवत असतात. वासमी यांनी हे विधान दिग्दर्शक बोनी कपूर यांना खिजवण्यासाठी केल्याचे बोलले जात आहे. या गोलमेज चर्चेला बोनी कपूर हे देखील उपस्थित होते. वासमी यांचे हे विधान उद्धटपणाचे असल्याची टीका हंसल मेहता यांनी केली आहे. 

नक्की वाचा :नोरा फतेहीने टीम मेंबरच्या लग्नासाठी दादरहून ट्रेनने गाठलं थेट रत्नागिरी

मेहता यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, " नागा वामसी नावाचे महाशय हे अत्यंत उद्धट आहेत आणि मला आता त्यांची खरी ओळख कळाली आहे. त्यांनी निर्माण केलेला लकी भास्कर हा चित्रपट 'स्कॅम' या वेबसिरीजमधला मजकूर बिनदिक्कतपणे चोरून बनविण्यात आला आहे." मेहता यांनी आपण तयार केलेली वेबसिरीजवरून इतर भाषांमध्ये चित्रपट बनविण्यात आल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.

मेहता यांनी पुढे म्हटले की सगळे जिंकलेत, इथे कोणी कोणापेक्षा मोठा नाहीये. असे कथानक रचले जाणे हे वाईट असते तरी त्यापेक्षा अहंकार हा त्याहून वाईट आहे. लकी भास्कर चित्रपटामध्ये 1990 सालची गोष्ट दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये एक मध्यमवर्गीय तरुण आर्थिक आर्थिक चणचणीमुळे घ्यावी लागणारी कर्जे, त्यातून होणारा अपमान हे दुष्टचक्र संपविण्यासाठी घोटाळे करतो असे दाखवण्यात आले आहे.  हंसल मेहता यांनी निर्माण केलेल्या स्कॅमचे वेगवेगळे भाग प्रसिद्ध झाले आहेत. पहिला भाग शेअर मार्केट घोटाळ्या आणि हर्षद मेहता यांच्यावर आधारीत होता. दुसरा भाग हा स्टँप पेपर घोटाळा आणि अब्दुल करीम तेलगीवर आधारीत होता.

नक्की वाचा: अभिनेता सोनू सूदला मिळाली होती मुख्यमंत्रिपदाची ऑफर, त्यानं नाकारली कारण...

वामसी यांनी गोलमेज चर्चेदरम्यान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे कौतुक करताना म्हटले की, Pushpa 2: The Rule हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईकरांची झोप उडाली होती. कारण या चित्रपटाने एका दिवसात बॉक्स ऑफिसवर 80 कोटी रुपयांची कमाई केली होती.  यावर तोंडसुख घेताना हंसल मेहता यांनी म्हटलंय, की मित्रा थंड घे, मी मुंबईत राहातो आणि मला छान झोप लागते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com