
Malyalam Actors Prithviraj, Dulquer Salmaan Under Scanner : लक्झरी गाड्यांच्या करचोरी प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि कस्टम विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पृथ्वीराज आणि दुलकर सलमान अडचणीत सापडले आहेत. 'ऑपरेशन नुमखोर' अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईत केरळमधील 30 पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. या प्रकरणात या दोन्ही सुपरस्टार अभिनेत्यांच्या निवासस्थानांचाही समावेश असल्याने चित्रपट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
DRI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईचे मुख्य केंद्र केरळमधील तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, कोट्टायम, कोझिकोड आणि मल्लपुरम हे जिल्हे आहेत. अनेक उच्चपदस्थ व्यक्ती आणि मोठ्या कार शोरूमच्या व्यवहारांची तपासणी केली जात आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )
या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, महागड्या परदेशी गाड्यांची भूतानमार्गे बेकायदेशीर आयात केली जाते आणि त्यांची करचोरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये नोंदणी केली जाते. त्यानंतर या वाहनांना देशाच्या विविध भागांमध्ये पाठवले जाते. यात अनेक वाहनांचे मूळ नोंदणी क्रमांक बदलून त्यांची ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही आढळले आहे.
( नक्की वाचा : Pune Traffic: पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव... )
या कारवाईमुळे पृथ्वीराज आणि दुलकर सलमान यांच्यासह अनेक बड्या व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. अधिकृतपणे या दोन्ही अभिनेत्यांविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नसला तरी, त्यांच्या घरावर पडलेले छापे ही तपास प्रक्रियेचा भाग असून, त्यांच्या व्यवहारांची सखोल चौकशी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world