Crime News : मॉडेलिंग क्षेत्रात खळबळ! मॉडल शीतलची गळा चिरून क्रूरपणे हत्या, नाल्यात तरंगत होता मृतदेह

म्युझिक इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना या घटनेने जबर धक्का बसला आहे. यापूर्वीही हरियाणात अनेक कलाकारांची हत्या करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

देशभरात सुरू असलेल्या क्रूर घटना पाहून हादरायला होत आहे. दररोज हत्या, बलात्कार, अपघाताच्या घटनांमध्ये कित्येकजण आपला जीव गमावतात. आता मॉडेलिंग क्षेत्रातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

हरियाणाच्या सोनीपतमधील खरकोदामधून एक घटना समोर आली आहे. येथील म्युझिक इंडस्ट्रीमधील मॉडल शीतल हिची गळा चिरून हत्या करण्यात आली. यानंतर तिला नाल्यात फेकून देण्यात आलं. नाल्यात तिचा मृतदेह तरंगत होता. यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Sunjay Kapur death : तोंडात मधमाशी गेल्याने कसा झाला मृत्यू? अशा प्रसंगी स्वत:चा बचाव कसा कराल? 

हत्या करीत नाल्यात फेकला मृतदेह...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल बेपत्ता झाल्याची तक्रार पानीपत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, शीतलचा गळा चिरून खून करण्यात आला आणि मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. पोलिसांकडून हत्येचा तपास केला जात आहे. 

हरियाणातील म्युझिक इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना या घटनेने जबर धक्का बसला आहे. यापूर्वीही हरियाणात अनेक कलाकारांची हत्या करण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article