जाहिरात

Sunjay Kapur death : तोंडात मधमाशी गेल्याने कसा झाला मृत्यू? अशा प्रसंगी स्वत:चा बचाव कसा कराल? 

एक छोटाचा किडा जीवघेणा होण्याची ही पहिली वेळ नाही. शरीरात एखादा किडा, मच्छर किंवा मशमाशी जाणं जीवघेणं ठरू शकतं.

Sunjay Kapur death : तोंडात मधमाशी गेल्याने कसा झाला मृत्यू? अशा प्रसंगी स्वत:चा बचाव कसा कराल? 

अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor) पहिला पती आणि उद्योगपती संजय कपूर  (Sunjay Kapur)  याचं गुरुवारी लंडनमध्ये निधन झालं. 53 वर्षीय संजय कपूर याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलो मॅच खेळत असताना त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यानंतर तो मैदान सोडून बाहेर गेला. थोड्यात वेळात त्याला हृदयविकाराचा झटका आहे. मॅचदरम्यान संजय कपूर याच्या तोंडात मधमाशी गेली होती. मशमाशीने गळ्यात दंश केला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. गळ्यात सूज आली आणि हृदयविकाराचा झटका आला. 

एक छोटाचा किडा जीवघेणा होण्याची ही पहिली वेळ नाही. शरीरात एखादा किडा, मच्छर किंवा मशमाशी जाणं जीवघेणं ठरू शकतं. संजय कपूर यांच्या प्रकरणात जर खरंच मधमाशी त्यांच्या तोंडात गेली असेल आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला तर हा एनाफाइलँक्सिस कारणास्तव झाला आहे. ही एक वैद्यकीय आपत्कालिन परिस्थिती मानली जाते. या परिस्थितीत वेळेत उपचार मिळाले नाही तर जीव जाण्याचा धोका असतो. 

Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा?

नक्की वाचा - Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा?


मधमाशीच्या दंशाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो? 


एनाफाइलॅक्सिसची स्थिती एक गंभीर एलर्जिक रिअॅक्शन आहे. मधमाशीच्या दंशात विष असतं. ज्यामुळे काहींना तीव्र एलर्जी होऊ शकते. जेव्हा मधमाशी तोंडाच्या आत दंश करते त्यावेळी संपूर्ण शरीरात एलर्जी रिअॅक्शन होऊ शकते आणि रक्तप्रवाह जलद गतीने कमी होतो. गंभीर एलर्जीक रिअॅक्शनमुळे हृदयाची गती कमी होऊ शकते किंवा थांबू शकतो. यातून हृदयविकाऱ्याचा झटका संभवतो.   

या विषयावर एनडीटीव्हीने प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि लेखक, जीवा आयुर्वेदाचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान यांच्याशी बातचीत केली. याबाबत ते काय म्हणाले जाणून घेऊया. 

नंबर १ - शांत राहा, घाबरू नका..

अशी परिस्थिती ओढवली तर घाबरू नका. घाबरल्याने श्वासाची गती वाढू शकते किंवा धाप लागू शकते. ज्यामुळे किडा श्वसननलिकेत अडकू शकतो. अशा स्थितीत श्वास गुदमरण्याचा धोका वाढतो. सरळ फुप्फुसात सूज किंवा ब्लॉकेज होऊ शकतो. 

नंबर २ - थुंकीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा..

किडा तोंडात असेल तर तातडीने थुंकीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा..

नंबर ३ - कोमट पाण्याने गुळण्या करा किंवा खोकल्यावाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा..

जर गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर खोकल्याद्वारे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. ही नैसर्गिक पद्धत आहे. यातून किडा बाहेर येऊ शकतो. 

नंबर ४ - जर चावा घेण्याचा धोका असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जा.
या सर्वांव्यतिरिक्त, जर तुम्हाला तोंडात किंवा घशात सूज येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा चक्कर येत असेल तर कदाचित त्या किड्याने तुमच्या  घशात चावा घेतला असेल. या स्थितीत, वेळ वाया न घालवता ताबडतोब डॉक्टरकडे जा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com