Hema Malini Career Strugal : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा विवाह 1980 मध्ये झाला होता. त्यावेळी धर्मेंद्र आधीच प्रकाश कौरसोबत विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती.सनी देओल, बॉबी देओल,अजीता आणि विजेता,अशी त्यांची नावं आहेत. परंतु, धर्मेंद्रसोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनीवर छोटी-मोठी संकटही आली होती. हेमा मालिनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या. जवळपास दहा वर्ष त्यांना या संकटाचा सामना करावा लागला. या काळात त्यांना मोठे कर्ज फेडावे लागले. लेखक राम कमल मुखर्जी यांच्या 'हेमा मालिनी : बियाँड द ड्रिम गर्ल' या पुस्तकात सांगितलं आहे की, लग्नानंतर जेव्हा हेमा अडचणीत होत्या,तेव्हा धर्मेंद्र यांनी मदतीची ऑफर दिली होती,पण हेमा यांनी ती स्वीकारली नाही. हेमाला आपल्या कमाई आणि मेहनतीच्या जोरावरच या समस्येतून बाहेर पडायचे होते.
जवळपास दहा वर्ष आयुष्यातील सर्वात कठीण काळ
कर्ज कसं वाढलं,याबद्दल हेमा यांनी स्पष्टपणे सांगितलं.त्यांनी म्हटलं की, त्यांच्या आई कर भरण्यात निष्काळजी होत्या. तर वडील वारंवार आठवण करून देत असत.हेमा यांच्या आईला वाटायचं की इतक्या मेहनतीने कमावलेल्या पैशावर इतका कर देणं योग्य नाही.वडिलांच्या निधनानंतर हेमा यांना जाणवलं की त्यांच्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आली आहे.पैसे लवकर जमवण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त चित्रपट करावे लागले आणि याच कारणामुळे त्या अनेकदा बी-ग्रेड चित्रपटांमध्येही दिसल्या. हेमा यांच्या मते हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, जो जवळपास दहा वर्षे टिकला.
नक्की वाचा >> पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ! 'ती' फॉर्च्युनर कोणाची? सीटवर सापडलं पिस्तुल अन्..
ईशा देओलने हेमा मालिनीबद्दल काय म्हटलं?
धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे.नंतर ईशा देओललाही तिच्या आईच्या या संघर्षांबद्दल माहिती मिळाली.तिने म्हटलंय की, अहानाच्या जन्मानंतर हेमा खूप शूटिंग करू लागल्या आणि घरी कमी राहू लागल्या.जेव्हा तिने दुर्गा,अंजाम,सीतापुर की गीता आणि जमाई राजा सारखे चित्रपट पाहिले,तेव्हा तिने आईला विचारले की त्या हे चित्रपट का करत आहेत.तेव्हा हेमा यांनी तिला कर्जाची संपूर्ण कहाणी सांगितली.धर्मेंद्र आणि हेमा यांची प्रेमकहाणीही चित्रपटांपासून सुरू झाली आणि वास्तव आयुष्यात बदलली.दोघांनी 1970 मध्ये तुम हसीन मैं जवानच्या शूटिंगपासून आपले नाते सुरू केले.24 नोव्हेंबर 2025रोजी धर्मेंद्र यांचे मुंबईत 89 व्या वर्षी निधन झाले.त्यांचा अंतिम संस्कार पवन हंस शवदाह गृहात झाला आणि 27 नोव्हेंबरला त्यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली.