Amir Khan And Gauri Spratt Viral Video : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आपल्या चित्रपटांसाठी तर चर्चेत असतोच,पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो नेहमीच प्रकाशझोतात येतो.परंतु, सध्यातरी आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रेटच्या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने या चर्चांना पूर्णविराम लावला होता.आमिर सना फातिमा शेखसोबतही डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.
आता आमिर खान नेहमीच गौरीसोबत दिसतो,मग ते एखाद्या शोमध्ये हजेरी लावणं असो किंवा प्रमोशन इव्हेंटमध्ये..आमिर आता पुन्हा एकदा गौरीसोबत स्पॉट झाला. गौरीच्या हातात हात घालून तो रोमॅन्टिक अंदाजात विमानतळावर येत होता. आमिर आणि गौरीचा हा प्रेमळ अंदाज कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
आमिर आणि गौरी दोघेही रोमॅन्टिक मूडमध्ये होते, पण..
या व्हिडीओत पाहू शकता की, दोघे मुंबई विमानतळावर लव्ही-डव्ही मूडमध्ये असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की,विमानतळाच्या गेटमधून बाहेर येताना आमिर समोर पॅपराझीला पाहतो,तेव्हा आमिरही थोडा वेळ थक्क होतो. आमिर गौरीचा हात पकडतो आणि तिला कारपर्यंत घेऊन जातो.दोघांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली असून चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. आमिर खानने काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर गौरीची ओळख पटवून दिली होती.
आमिर खान-गौरी स्प्रेटचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल
आमिर खानचं वैयक्तिक आयुष्य म्हणजे जणू एक खुलं पुस्तक आहे. त्यांना आवडणारा प्रत्येकजण हे जाणतो की गौरीला डेट करण्यापूर्वी आमिरने दोन लग्नं केली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव रीना दत्ता आणि दुसऱ्या पत्नीचं नाव किरण राव आहे. आमिर जरी दोन्ही पत्नींपासून वेगळा झाला असला तरी त्याचे एक्स वाइफ्ससोबत चांगले संबंधआहेत.गौरीबद्दल बोलायचं झालं तर त्या घटस्फोटित आहेत आणि त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. गौरी आता आमिरसोबत त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world