HIBOX App Scam: अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अडचण वाढणार? 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची नोटीस

HIBOX अॅपचं प्रमोशन अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कॉमेडियन भारती सिंह, यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान यांनी केलं आहे.रिया चक्रवर्तीच्या आधी दिल्ली पोलिसांनी एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांनाही नोटीस जारी केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hibox ॲपशी संबंधित 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. रियावर आरोप आहे की, तिने जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. दिल्ली पोलिसांना रिया चक्रवर्तीला 9 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. 

दिल्ली पोलिसांनी याआधी या घोटाळ्यात कॉमेडियन भारती सिंग आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव यांनाही समन्स पाठवले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Hibox ॲपशी संबंधित प्रकरणात 500 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार शिवराम याला दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

शिवराम याने नोव्हेंबर 2016 मध्ये सवरुल्ला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. यानंतर Hibox ॲप फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आले. या ॲपद्वारे सुमारे 30 हजार लोकांची फसवणूक झाली आहे. 

कसा झाला HIBOX ॲप घोटाळा?

Hibox ॲपला गुंतवणूक योजना म्हणून प्रमोट करण्यात आलं. या ॲपमध्ये साइन अप करून पैसे गुंतवले जातात. ॲपद्वारे गुंतवणुकीवर तुम्हाला 5 टक्कांपर्यंत व्याज मिळेल असा दावा केला जात होता. अलीकडेच दिल्ली पोलिसांना या प्रकरणी 500 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ॲपने 30 हजारांहून अधिक लोकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 500 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Advertisement

महिनाभरात 30 ते 90 टक्के परतावा देण्याचा दावा देखील अॅपच्या प्रमोटर्सनी केला होता. या ॲपमध्ये  गुंतवणूक केलेल्या नागरिकांना सुरुवातीच्या काही महिन्यांत परतावा देखील मिळाला. त्यानंतर जुलै 2024 मध्ये या ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी समोर आल्या. त्यानंतर कायदेशीर वैधता सांगून पेमेंट थांबवण्यात आले. आता गुंतवणूकदारांना त्यातून पैसे काढता येत नाहीत.

HIBOX अॅपचं कुणी कुणी केलं प्रमोशन?

HIBOX अॅपचं प्रमोशन अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कॉमेडियन भारती सिंह, यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान यांनी केलं आहे.रिया चक्रवर्तीच्या आधी दिल्ली पोलिसांनी एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांनाही नोटीस जारी केलं आहे. यूट्युबर पुरव झा आणि लक्ष्य चौधरी यांची देखील चौकशी झाली आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article