Asha Bhosle Educational Qualification : भारतातील संगीत क्षेत्रातील सर्वात प्रभावी आवाजांपैकी एक दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अख्खा देश दु:खात बुडाला आहे. आशा ताई एक असाधारण गायिका होत्या. इतकच नाही तर त्यांनी संघर्ष आणि यशाचा नवा आदर्श उभा केला आहे. तब्बल ८ दशकांपर्यंत त्यांनी संगीत प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य केलं. आपल्या आवाजाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचं शिक्षण किती झालंय याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?
शिक्षणापेक्षा संगीताला अधिक महत्त्व...
१९४३ मध्ये अवघ्या १० व्या वर्षीत त्यांनी शाळा सोडली. म्हणजे आताची जवळपास पाचवी. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी शिक्षण सोडलं आणि गायक-अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आशाताईंसाठी संगीत सर्वात मोठी शाळा आणि रियाज त्यांचं शिक्षण झालं. दहाव्या वर्षीत शाळा सोडल्यानंतरही त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केलं. अमरावती आणि जळगाव विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली.
रेकॉर्ड अन् सन्मान...
- आशाजींनी त्यांच्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्यांच्या प्रतिभेची कल्पना यावरुन येते की, त्यांना १९८७ मध्ये 'मेरा कुछ सामान' चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
- २००० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- २००८ साली त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं. याव्यतिरिक्त, त्यांनी सात फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले.