भारताचा पहिला हॉरर सिनेमा झळकला 76 वर्षांपूर्वी, गाणी ऐकून लोक घाबरायचे; रेकॉर्डब्रेक केली कमाई

India First Horror Movie: भारताचा पहिला हॉरर सिनेमा 76 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमाने हॉरर सिनेमांचा ट्रेंड सुरू केला आणि रेकॉर्डब्रेक कमाई देखील केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
India First Horror Movie : भारताचा हा पहिला हॉरर सिनेमा 76 वर्षांपूर्वी झाला होता रिलीज

Indias First Horror Movie: सिनसृष्टीत भयपटांचाही वेगळाच प्रभाव आहे. हॉरर सिनेमा पाहताना भीती वाटत असली तरीही प्रेक्षक आवडीने ते पाहतात. तुम्हाला आपल्या देशातील पहिल्या हॉरर सिनेमाचे नाव माहीत आहे का? नाही म्हणता, आम्ही तुम्हाला सांगतो. 1949मध्ये महल नावाचा हॉरर सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता, या सिनेमामुळे देशामध्ये हॉरर सिनेमांचा ट्रेंड सुरू झाला असे म्हणतात.  कमल अमरोही दिग्दर्शित हा सिनेमा त्या काळामध्ये सुपरहिट ठरला शिवाय या सिनेमाने भारतीय प्रेक्षकांना रहस्य - भूतांच्या कथांची ओळख करून दिली. 'महल' सिनेमाची निर्मिती बॉम्बे टॉकीजने केली होती आणि हा सिनेमा त्या काळातील बिग बजेट सिनेमांपैकी एक होता, असेही म्हणतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारताच्या पहिल्या हॉरर सिनेमाचे बजेट 

महल सिनेमा त्या काळात प्रचंड चर्चेत होता. या सिनेमावर त्या काळात सुमारे 12 लाख रुपये (आजच्या काळातील 12-14 कोटी रुपये) खर्च झाल्याचे म्हटले जाते. त्या काळासाठी ही रक्कम फार मोठी होती. सिनेमाचा भव्य सेट, उत्कृष्ट छायांकन आणि मधुबालासारख्या मोठ्या स्टार्सच्या सहभागामुळे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला होता. कमल अमरोही यांनी ही कथा एक रहस्यमय आणि मानसशास्त्रीय थ्रिलर म्हणून सादर केली, हा प्रकार त्यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवीन होता.

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: एण्ट्रीवर डीजवाल्याने चुकीचे गाणं लावल्याने नववधू भडकली, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले- बरं झालं!)

भारताचा पहिला हॉरर सिनेमा 

भारताच्या पहिल्या हॉरर सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 

'महल'ने बॉक्सऑफिसवर शानदार कमाई केली होती. सिनेमाने भारतामध्ये जवळपास 25 लाख रुपये (आताच्या काळाच्या हिशेबाने 200 कोटी रुपये) इतकी कमाई केली होती, हा त्या काळातील रेकॉर्ड होता. प्रेक्षकांकडून मधुबाला आणि अशोक कुमार यांच्या जोडीला चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.   

Advertisement

(नक्की वाचा: Bollywood News: ज्या हॉटेलमध्ये वडील होते वेटर, तेच विकत घेऊन सुपरस्टारने बाबांना दिलं गिफ्ट; नेटवर्थ ऐकून बसेल धक्का)

भारताचा पहिला हॉरर सिनेमातील कलाकार आणि स्टोरी

‘महल' सिनेमामध्ये अशोक कुमार आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अशोक कुमार यांनी एका अशा व्यक्तीची भूमिका साकारली होती जो रहस्यमय हवेलीमध्ये जातो, जेथे ते एका सावलीच्या (मधुबाला) प्रेमात पडतात. मधुबाला यांचे सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी केली. सिनेमामध्ये प्रेम, पुनर्जन्म आणि रहस्याचे मिश्रण पाहायला मिळालंय. 'महल'ने भारतीय हॉरर सिनेमाचा पाया घातला, यानंतर 'बीस साल बाद' आणि 'रात' सारख्या सिनेमे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले.