India's Got Latent कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. रणवीर अलाहबादियाने केलेल्या वक्तव्यामुळे India's Got Latent शो वादात अडकला आहे. रणवीरने एका स्पर्धलाका त्याच्या पालकांबद्दल एक संतापजनक सवाल केला होता. या सर्व घडामोडींमुळे India's Got Latent शोवर देखील टांगती तलवार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
समय रैनाचा India's Got Latent शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. यूट्युबवर या शोच्या प्रत्येक एपिसोडला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. यामुळे समय रैनादेखील चर्चेत आहेत. समय रैनाची सर्वात महागड्या स्टँडअप कॉमेडियनमध्ये सध्या चर्चा होते. मात्र समय रैना नेमकी किती कमाई करतो हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे.
(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)
कॉमेडीव्यतिरिक्त, समय रैनाला बुद्धिबळातही रस आहे. कोरोनादरम्यान, प्रसिद्ध बुद्धिबळपटूंसोबत युट्यूबवर बुद्धिबळ सामने लाईव्ह स्ट्रीम करून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय, 2019 मध्ये, तो ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या शो 'कॉमिकस्तान सीझन 2' चा सह-विजेता होता.
सोशल मीडियावरही समय रैना प्रचंड लोकप्रिय आहे. समयचे इंस्टाग्राम पेजवर 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या यूट्यूब पेजवर देखील 70 लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.
(नक्की वाचा- Indias Got Latent: कॉमेडीच्या नावाखाली विकृती! समय रैना, रणवीर अलाहबादियावर नेटकऱ्यांचा संताप; गुन्हा दाखल)
समय रैनाची एकूण संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आयुष्मान पंडिता यांच्यानुसार, समयची एकूण संपत्ती सुमारे 195 कोटी रुपये आहे. तो यूट्यूब व्हिडिओ आणि वेगवेगळ्या शोद्वारे दरमहा दीड कोटी रुपये कमावतो. ब्रँड डील आणि लाईव्ह शो सारख्या इतर कमाईतून त्याची मालमत्ता सतत वाढत आहे.