BIGG BOSS Marathi : आयपीएलचं मैदान ते बिग बॉसचं घर, ती 'परदेसी गर्ल' कोण?

'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या घरात येणारी ती 'परदेसी गर्ल' कोण आहे याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

‘BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere या रविवारी 28 जुलै रात्री 9 वाजता पार पडणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात येणारे 16 चेहरे कोण असणार यांची उत्सुकता सगळ्यांना आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या घरात येणारी ती 'परदेसी गर्ल' कोण आहे याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

Advertisement

आयपीएलचं मैदान गाजवणारी इरिना रूडाकोवा (IRINA RUDAKOVA) बिग बॉसमधील स्पर्धक असू शकते. बिग बॉसच्या प्रोमोच्या सोशल मीडियावरील पोस्टवर काहींनी ही परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा असल्याचं म्हटलं आहे. मात्र ही इरिना रूडाकोवा आहे तरी कोण याबाबत जाणून घेऊया.

Advertisement

इरिना रूडाकोवा आयपीएलमध्ये चिअर गर्ल म्हणून सहभागी झाली होती. आयपीएल 2024 च्या कोलकाता आणि हैदराबाद विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ती सहभागी झाली होती. इरिना रूडाकोवा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या बाजूने होती. 

Advertisement

इरिना रूडाकोवाच्या इन्साग्राम प्रोफाईलवर नजर टाकली तिने लिहिलंय की, मॉडेल, अभिनेत्री आणि योगा करण्याची तिला आवड आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाख 54 हजार फॉलोअर्स आहेत. इरिना रूडाकोवा बिग बॉसच्या घरात जर आली तर ती आपल्या हटके फॅशन, व्यक्तीमत्त्व, किलर लूक, घायाळ करणाऱ्या अदांनी वेगळी छाप पाडेल हे नक्की. 

कसं असेल यंदाचं बिग बॉसचं घर?

यंदा बिग बॉसच्या घरासाठी खास चक्रव्यूह थीम करण्यात आली आहे. घरातील प्रत्येक कोपरा खूप विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे. घरामध्ये कोझी कॉर्नर आहेत. घरातील प्रत्येक गोष्ट गोलाकार ठेवण्यात आली आहे. यावरून  चक्रव्यूह थीम हायलाईट होते. घरातील सदस्यांसाठी ‘बिग बॉस'च्या घरात खास अंडर वॉटर बेडरूम बनवण्यात आलं आहे. बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान डायमंड रूम बनवण्यात आली आहे. घरात सर्वात जास्त आकर्षित करतं ते म्हणजे चहूबाजूंनी आरश्यांनी सजलेलं त्यातील क्लासी वॉशरुम. त्यामुळेही तिथेही बिंबप्रतिबिंबाचा खेळ आहे. 

कलरफुल लिव्हिंग एरियामध्ये रितेश भाऊ दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. लिव्हिंग एरियात मुखवट्यांनी डिझाइन करण्यात आलेली ही भिंत जागा लक्षवेधी आहे. त्यामुळे स्पर्धकांचे मुखवटे इथेच उतरवले जातील. ‘बिग बॉस'च्या घरातील किचनमध्ये स्पर्धक जेवण बनवण्याबरोबरच गॉसिपही करताना दिसतील. ‘बिग बॉस'च्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा' करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे. गार्डन एरियामध्ये हिरवळ आहे. तसेच बाल्कनीदेखील आहे. घरातील प्रत्येक गोष्ट लांबून थ्रीडी वाटत असली तरी जवळ गेल्यावर त्यातील सौंदर्य दिसून येतं. कन्फेशन रूममधील रिफ्लेक्शन्स स्पर्धकांना गोंधळात पाडणारे आहेत. गार्डन एरियामध्ये स्पर्धांना व्यायाम करण्यासाठी जीम आणि स्विमिंग पूल आहे. एकंदरीतच 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं घर भान उडवणारं, चक्रावणारं आहे. या चक्रव्यूहात कोणते स्पर्धक सहभागी होणार हे आज स्पष्ट होईल. 

Topics mentioned in this article