- सुप्रीम कोर्ट ने जैकलीन फर्नांडिस की PMLA मामले में याचिका पर सुनवाई से इनकार कर दिया है.
- न्यायालय ने कहा कि आरोप हैं कि जैकलीन को 200 करोड़ रुपये का हिस्सा उपहार में मिला था.
- जैकलीन की ओर से कहा गया कि उन्हें सुकेश चंद्रशेखर के ठग होने की जानकारी नहीं थी.
चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आता सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही जॅकलिनना जबर धक्का बसला आहे. सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसने ती फिल्म स्टार असल्याचाही उल्लेख केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले, तुम्हाला 200 कोटी रुपयांचा काही भाग भेट म्हणून मिळाला आहे. कायद्यात कोणीही सहभागी होऊ शकतं. दोन अतिशय जवळच्या मित्रांपैकी एक मित्र दुसऱ्या मित्राला काही देतो आणि नंतर ते गुन्हा करतात. तर यात काहीतरी काळंबेर आहे.
नक्की वाचा - Zubeen Garg : जुबिन गर्गला हृदयविकाराचा झटका आला नव्हता, मृत्यूच्या प्रमाणपत्रातून धक्कादायक कारण आलं समोर
तर दुसरीकडे जॅकलिन फर्नांडिसकडून वरिष्ठ वकील मुकुल रोहतगीने सांगितलं की, जॅकलीन 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगमधील सामील नाही. सुकेश तिची फसवणूक करीत असल्याचं तिला माहीत नव्हतं. जॅकलिनच्या वतीने ते म्हणाले, मी एक फिल्म स्टार आहे. या माणसाने फसवणूक केली. तो तुरुंगात आहे. त्याच्यावर बनावट मंत्री असल्याचा आरोप आहे. तो लोकांना फोन करतो. मंत्री असल्याचे भासवतो. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्याने मला भेटवस्तू पाठवल्या होत्या. मी त्याला 200 कोटी रुपयांच्या हेराफेरीत मदत केल्याचा कोणताही आरोप नाही. खंडणी प्रकरणात माझे नाव नाही. त्या 200 कोटी रुपयांमध्ये माझा कोणताही वाटा नाही.