
Zubeen Garg Death : प्रसिद्ध गायक आणि अभिनेता जुबिन गर्ग याचं 19 सप्टेंबरला निधन झालं. काही वृत्तांनुसार, जुबिनचं निधन हार्टअटॅकमुळे झालं आहे. यानंतर मोठ्या हालचाली घडत आहेत. जुबिनच्या मृत्यूनंतर त्याचा मॅनेजर सिद्धार्थ आणि फेस्टचे आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जुबिन गर्गच्या पत्नीने मध्यस्थी करीत मॅनेजरला जुबिनच्या अंत्यसंस्कारात सामील होऊ द्यावं अशी चाहत्यांकडे विनंती केली. अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, सिंगापूर उच्चायोग आणि सिंगापूर उच्च न्यायालयाने जुबिन गर्गच्या मृत्यूचं प्रमाणपत्र जारी केलं आहे, ज्यामध्ये बुडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
रविवारी मीडियासोबत बातचीतमध्ये सरमा यांनी सांगितलं की, सिंगापूर उच्चायोगाने आपला प्रिय जुबिन गर्ग याच्या मृत्यूचं प्रमाणपत्र जारी केलं आहे, ज्यामध्ये बुडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्याचं निधन सिंगापूरमध्ये झालं. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सिंगापूर पोलिसांकडून केला जाईल. आसाम सरकार हत्येचा कट रचल्याच्या आरोपांचा तपास करेल.
नक्की वाचा - Singer zubeen Garg News: हसत हसत पाण्यात उतरला, पुढच्याच क्षणी भयंकर.. जुबीन गर्गचा अखेरचा VIDEO समोर
ते पुढे म्हणाले, ते पुढे म्हणाले, नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल (एनईआयएफ) चे संस्थापक श्यामकानू महंत आणि गर्ग यांचे दीर्घकाळ असलेले मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांच्याविरुद्ध एकूण 54 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ही प्रकरणं सीआयडीकडे आहेत. 21 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शर्मा दिल्लीत होते आणि गरिमा गर्ग यांनी त्यांची अटक रोखली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world